सावधान !
अन्न व औषधी विभागाने कारवाई करावी, नागरिकांची मागणी !
चंद्रपूर प्रतिनिधी :–
शहरातील बांगला चौक येथे प्रशीद्ध असणाऱ्या अन्नपूर्णा स्विटमार्ट मधील केक मधे विषयुक्त पदार्थ मिसळविले गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून नुकत्याच बागला शाळेतील सहावीत शिकणाऱ्या 15 विद्यार्थ्यांना केक खाल्ल्याने विषबाधा झाली आहे, विषबाधा झालेले विद्यार्थी 12 ते 13 वर्षे वयोगटातील आहेत. शहरातील बागला शाळेत सहावीत शिकणाऱ्या 2 विद्यार्थिनींचा वाढदिवस असल्याने विद्यार्थ्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला होता, मात्र केकमधे विषयुक्त पदार्थ मिसळविले गेल्याने विद्यार्थ्याना विषबाधा झाली असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
विद्यार्थ्यांना बांगला चौकातील अन्नपूर्णा स्वीट मार्टमधून केक घेतला. वर्गात केक कापून दोघांचा वाढदिवस साजरा केला. तब्बल 15 मिनीटांनी एकूण 15 विद्यार्थ्यांना पोटदुखी व उलट्या होण्यास सुरुवात झाली. अचानक विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यात 9 मुले व 6 मुली यांच्यावर डॉक्टरांनी औषधोपचार केले. काल संध्याकाळपर्यंत 9 विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले होते. तर 6 विद्यार्थिनींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0 comments:
Post a Comment