Ads

अखेर मुत्यूशी झुंज देत अंकीताने सोडला अखेरचा श्वास

दिनचर्या / नागपूर :थोडक्यात -



हिंगणघाट पीडिता अंकिता पिसुड्डे हिचा आज सकाळी 6:55 मिनिटांनी हृदयविकाराच्या दोन झटक्याने मृत्यूशी झुंज अपयशी झाला असून ऑरेंज सिटी रुग्णलयात तिचा उपचार सुरु होता तर काल दिनांक 9 फेब्रुवारी च्या सायंकाळी 5 च्या मेडिकल बुलेटिन मधे तिची प्रकृती चिंताजनक असल्याने विशेष विमानाने मुंबई येथे नेण्याची तयारी सुरु होती.
एकाचवेळी हृदय, यकृत व मूत्र पिंड एकाच वेळी निकामी झाले होते त्यामुळे कमी रक्तदाबामुळे आज सकाळी हृदयाचे दोन झटके आल्याने तिचा दुर्दैवी अंत झाला.

काय आहे संपूर्ण हिंगणघाट जाळीत प्रकरण वाचा खाली -
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या नंदोरी चौक परिसरात दारोडा येथील 30 वर्षीय प्राध्यापिका तरुणीच्या अंगावर माथेफिरू विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले व तो तेथून पसार झाला होता. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली. आरोपीला चार तासांच्या आत पोलिसांनी बुटीबोरी जवळील टाकळघाट एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले. घटनेनंतर लगेच पीडित प्राध्यापिकेला नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोपी हा शिक्षिका राहत असलेल्या दारोडा गावातीलच आहे.
पीडिता मातोश्री कुणावार महिला कॉलेजमध्ये बॉटनी या विषयाची प्राध्यापिका होती. नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना एक युवक पाठीमागून दुचाकीवर आला. त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. स्वतःच्या गाडीतील पेट्रोल काढले. त्याने सोबत कपडा गुंडाळलेला टेंभा आणला होता. त्याने मुलीच्या पाठीमागे जाऊन अंगावर पेट्रोल टाकले व पेटवलेला टेंभा तिच्या अंगावर फेकून तिथून पळ काढला होता.
त्याचवेळी तिथून जात असलेल्या सहकारी प्राध्यापिका आणि या मार्गाने जाणाऱ्या इतर युवकांनी आग विझवून येथील उपजिल्हा रुग्णांलयात दाखल केले. तरुणी गंभीर भाजली असल्याने प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे हलविण्यात आले आहे. तिला वाचविण्यासाठी डॉक्‍टर शर्थीचे प्रयत्न करीत होते. तरीही येते सात दिवस तिच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले होते. काल तिला श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने कृत्रिम श्‍वास यंत्रणेवर ठेव ल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली होती. प्रकृती गंभीर असताना सोमवारी सकाळी 6.55 मिनिटांनी तिचा मृत्यू झाला.
आरोपीला आमच्या समोर जाळा :माझा मुलीचा सात दिवसांनी मृत्यू झाला. आता आरोपीला आमच्या ताब्यात द्या व आमच्या समोर जाळा. त्यालाला तशीही वेदना झाली पाहिती, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली.
संसर्गामुळे ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी :
पीडितेला औषधं देऊन हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढवण्याचा प्रयत्न डॉक्‍टरांनी केला. काल रात्रभर तिला वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते. संसर्गामुळे रक्तपेशी, रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे मेंदू, फुफ्फुसांवरही परिणाम झाला होता, असे डॉक्‍टरांनी सांगितले. पीडितेचे पार्थिव पोलिसांकडे सुपूर्द केले जाणार आहे.
शनिवारपासूनच व्हेंटिलेटरवर :
पीडितेला श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने शनिवारपासूनच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर डॉक्‍टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि आठवड्याभरापासून सुरू असलेली तिची मृत्यूशी झुंज संपली.
जळीतकांड प्रकरण :
30 वर्षीय प्राध्यापिका दररोज सकाळी कामावर जाताना आरोपी विकेश नगराळे तिचा पाठलाग करायचा. सोमवारी तीन फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवायला जात असताना आरोपी तिचा पाठलाग करीत होता. हिंगणघाट शहरातील नंदोरी चौकात येताच आरोपीने तिच्यावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली होती.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment