चंद्रपूर प्रतिनिधी :–

शहरातील रामनगरच्या परिसरात स्थित वजन व मापन शास्त्र विभागात अधिकारी कर्मचारी यांची अनोखी तर्हा बघावयाला मिळत असून या कार्यालयात कोणी येतच नाही हा ग्रह धरून येथील निरीक्षक, लेखापाल आणि लिपिक हे चार वाजेच्या आतच कार्यालयातून बेपत्ता होतं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात प्रत्यक्ष काही पत्रकार मंडळीनी या कार्यालयाला सायंकाळी ४,०० वाजता भेट दिली असता तिथे सर्व खुर्च्या खाली होत्या तर एक वयस्क चपराशी या कार्यालयाची देखरेख करीत असल्याची माहिती मिळाली, खरं तर येथील निरीक्षक आणि लिपिकाना नेमके काय काम आहे याचा लेखाजोखा कुठेही दिसत नसून केवळ मिटींगच्या नावाखाली दुकानदारांकडून आगाऊचे पैसे घेणे आणि ठेकेदारांकडून ठराविक रक्कम घेवून वैद्य मापन ( वजन काटे ) नवीनिकरन करण्याच्या कार्यात व्यस्त असल्याचे आता उघड होतं आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप. मोठंमोठे इलेक्ट्रॉनिक वजन काटे आणि प्रत्त्येक दुकानदार यांचे परीक्षण करण्यासाठी हे अधिकारी वर्षातून लाखों रुपयाची मालसुताई करीत आहे. तरीही त्यांच्याकडून दुकानदार ग्राहकांना योग्य ती सेवा मिळत नाही अशी ओरड होतं असतांनाच आता हे अधिकारी कर्मचारी कार्यालयातूनच गायब राहत असतील तर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणे आवश्यक आहे.