पुन्हा कोळसा माफियांची कोळसा तस्करी सुरूच ? सबसिडीचा कोळसा ऊतरतोय नागाडा-पडोली च्या कोळसा टालवर ?
दलालांकडून चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीतून सबसिडीच्या कोळशाची उचल, ते कोळसा माफिया कोण ? त्याची यादी होणार लवकरच जाहीर !
कोळसा चोरी :
चंद्रपूर प्रतिनिधी :-
मागील महिन्यात उघड झालेल्या कोळसा तस्करीचे प्रकरण ताजे असतांना व कैलास अग्रवाल यांच्यासह इतर दोन आरोपीं विरोधात गुन्हे दाखल होऊन लघु व मध्यम उद्योगांना सबसिडीच्या दरात मिळणारा कोळसा महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन मार्फत पुरवठा बंद केला असतांना आता तो कोळसा वेकोलि मार्फत सरळ लघु ऊद्दोगाना जात आहे, मात्र यामधे सुद्धा कोळसा माफिया सक्रिय झाले असून वेकोलिच्या कोळसा खाणीतून कोळशाची उचल करून तो चोर मार्गाने पडोली व नागाडा कोळसा टाल वर उतरवील्या जात असल्याचा गंभीर प्रकार पुन्हा सुरू झाला आहे .
सबसिडीचा कोळसा हा कुठलीही परवानगी नसतांना बेकायदेशीरपणे चालत असलेल्या नागाडा व पडोली कोळसा टालवर कोळसा माफियाकडून उतरवील्या जातो व वाढीव किमतीने तो काळ्या बाजारात मोठ्या स्तरावर विकल्या जातो. फेब्रुवारी महिन्यात असाच चोरीचा कोळसा पोलिसांनी पकडला होता. या प्रकरणानंतर महाराष्ट्र स्टेट मायनिंग कार्पोरेशनचे करारच वेकोलीतर्फे रद्द करण्यात आले. हे प्रकरण इथेच थांबेल असे वाटत असतानाच आता पेंडिंग (बचत) कोळसा उचल करून तो पुन्हा नागाडा व पडोली येथील बेकायदेशीर चालणाऱ्या कोळसा टालवर जमा करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुजरात येथील मेसर्स काठीयावाड कोल अन्ड कोक कंन्झुमर्स अन्ड ट्रेडर्स असोसिएशन अहमदाबाद या कंपनीला चंद्रपूर वेकोलि खाणीतून सबसिडी चा कोळसा उचलण्याचे कंत्राट वेकोलीतर्फे देण्यात आले आहे. लघु-मध्यम उद्योगांना सबसिडीच्या दरात मिळणारा हा कोळसा संबंधित उद्योगांना मिळायला हवा. परंतु चंद्रपुर-नागपुर येथील कोळसा तस्कर संबंधित वेकोली अधिकार्यांशी संगनमत करून हा कोळसा पडोली व नागाडा येथील अवैध कोल डेपोवर साठा करून नंतर तो खुल्या बाजारात चढ्या दराने विकल्या जातो. या धंद्यात कुप्रसिद्ध कोळसा तस्कर सामील आहेत. नुकताच कोरोना ने घातलेल्या थैमानामुळे केंद्रीय सरकारच्या आदेशाने ट्रान्सपोर्ट (वाहतुक) थांबविण्यात आली होती. परंतु खदानी मधून कोळशाचे उत्खनन सुरू होते, याच संधीचा लाभ घेत कोळसा तस्करांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वेकोलि कोळसा खाणीतून कोळसा लोडिण्ग करुन ठेवला आहे व संधी मिळेल तेंव्हा तो कोळसा ट्रक मध्ये लोड करून चोर मार्गाने नागाडा व पडोली येथील कोल डेपोवर नित्यनेमाने उतरविल्या जात आहे. महत्त्वाचे म्हणजे अद्यापही केंद्र सरकारने कोणत्याही वाहतुकीस परवानगी दिलेली नाही. परंतु कोळश्याचे लोडींग ट्रक चोर मार्गाने नागाडा व पडोलीपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.
या प्रकरणात वेकोलि चे भ्रष्ट अधिकारी व संबंधित विभाग यांच्याशी हातमिळवणी करून कोळसा माफिया शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या कोळशाची होणारी ही आहे,
या प्रकरणी अगोदरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कैलास अग्रवाल व इतर कोळसा तस्कर आणि महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन नागपूर यांच्या संगनमताने चोरी मोठ्या प्रमाणात होऊन सरकारच्या राष्ट्रीय संपत्तीची चोरी उजेडात आणण्यासाठी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा अशी मागणी केली होती, ते प्रकरण सद्ध्या न्यायप्रक्रियेत असतांना आता त्याचं पद्धतीचे प्रकरण पुन्हा उजेडात आले असल्याने कोळसा माफियाचे हात किती वरपर्यंत पोहचले आहे याची प्रचिती येते, आता ते कोळसा माफिया कोण आहेत त्याची यादी लवकरच समोर येणार आहे, मात्र देशात पूर्णतः संचारबंदी असतांना त्यांच्या आडून पुन्हा जर कोळसा तस्करी होतं असेल तर हे आणखी भयंकर असून या प्रकरणी जिल्हा पोलिस अधिक्षक रेड्डी यांनी तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी होतं आहे.
0 comments:
Post a Comment