Ads

नागभीड तालुक्‍यातील हमाल बांधवांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने सुरक्षा कीटचे वितरण.नागभीड तालुक्‍यातील हमाल बांधवांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने सुरक्षा कीटचे वितरण. 

 चंद्रपूर :- दिनचर्या न्युज :-

भाजपा नेते, राज्याचे माजी अर्थमंत्री व आम. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वतीने सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत नागभीड तालुक्यातील शासकीय गोदामात अहोरात्र काम करणा-या हमाल बांधवांना कोरोना व्हायरस पासुन सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षा किट चे वाटप करण्यात आले

 कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी या सुरक्षा किट च्या माध्यमातुन जागृती करण्यात येत आहे. या किट मध्ये हमाल बांधवांसाठी मास्कसॅनिटायझर व हॅण्डवाश लिक्विड चा समावेश आहे. या गोडावुन मध्ये सातत्याने सार्वजनिक वितरण प्रणाली साठी आवश्यक अन्नधान्याची साठवणुक करणे व गावागावात वितरण करणे  सुरु असते. ही बाब लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेतर्फे या सुरक्षा किट चे वितरण सुरु केलेले आहे.  आज तालुक्यातील नागभीड व तळोधी (बाळा.) च्या शासकीय गोदामामध्‍ये या सुरक्षा किटचे वाटप भाजपा चंद्रपुर जिल्हा महामंत्री व जि.प.सदस्य तसेच जिल्हा अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य संजय गजपुरे व नागभीड नगरपरिषद चे उपाध्यक्ष गणेश तर्वेकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रपुर जिल्हा हमाल माथाडी लेबर युनियन चे उपाध्यक्ष जीवन प्रधान, गोडावुन किपर अविनाश गेडाम,संगणक चालक सुमित खोब्रागडे , नागभीडचे माजी ग्रा.पं. सदस्य मनोज कोहाड, विनोद गिरडकर यांची उपस्थिती होती. 


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment