Ads

चिमुकलीने आपली पिगी बँक देवून केली मदत





चिमुकलीने आपली पिगी बँक देवून केली मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व जिल्हा सहाय्यता निधीत मदतीचा ओघ वाढला

प्रशासनाकडून मदतीचे आवाहन


चंद्रपूर, दि. 21 एप्रिल: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असून या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी कोविड-19 या माध्यमातून जमा केला जात आहे. तिसऱ्या वर्गातील तनिष्का शर्माने आपली पिगी बँक देवून कोरोना विरुध्दच्या लढ्यासाठी जिल्हा सहाय्यतेला मदत केली आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत निधीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास  उत्तम प्रतिसाद मिळत असून या आवाहनास  प्रतिसाद देत अनेक संस्था,व्यक्ती यांनी जिल्हा सहायता निधीच्या खात्यात देणग्या देणे सुरू केले आहे.

आज प्रामुख्याने जुबली फाउंडेशन चंद्रपूर (1994 बॅच) रेवती बडकेलवार,आरती श्रावणी व संतोष तेलंग यांच्या हस्ते  रु.21 हजार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्युत कर्मचारी सह. पतसंस्था ऊर्जानगरच्या वतीने रु.20 हजारजिल्हा परिषद शिक्षण कर्मचारी सह.पतसंस्था गडचांदूरजय भारत मजूर सह.संस्था विसापूरप्रतिकार नागरी सह. पतसंस्था जुनासुर्लासेवा सहकारी संस्था चार्ली,ममता नागरी सह. पतसंस्था चंद्रपूरच्या वतीने  प्रत्येकी रु.11 हजारअजय मेकलवार चंद्रपुर यांच्याकडून रु.31 हजारचंद्रपूर नागरी सह. पतसंस्था चंद्रपूरच्या वतीने रु.15 हजार  तर सौरभ ट्रेडर्स चंद्रपूर यांचेकडून रु.21 हजाराचा धनादेश जिल्हा सहायता निधीस देण्यात आला.

त्यासोबतच मुख्यमंत्री सहायता निधी कोविंड-19 या स्वतंत्र बँक खात्यामध्ये राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग रिसर्च टेक्नॉलॉजी चंद्रपूरच्या वतीने रु.1 लक्ष50 हजार सहायता निधी देण्यात आला.

मदतीसाठी या बँक खात्यात निधी जमा करा

      कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक  960310210000048 असून यासाठी आयएफएससी कोड  BKIDOOO9603  असा आहे. जिल्ह्यातील उद्योजक,कंपन्यांचे प्रमुखस्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment