Ads

अन् अख्ख गाव मदतीसाठी सरसावला, नागभीड तालुक्यातील देवपायली येथील घटना.




अन् अख्ख गाव मदतीसाठी सरसावला
नागभीड तालुक्यातील देवपायली येथील घटना.


   चंद्रपूर :-       संपूर्ण देशात कोरोना या महामारीने थैमान घातले असून भारतभर लॉक डाउनचा परिणाम जाणवू लागला आहे. मोलमजुरी च्या भरोशावर पोटाची खळगी भरायची आणि घर चालवायचा, असा नित्यनियम बहुतेक गरीब लोकांचा चालू असतानाच कोरोनाचा पादुर्भाव आल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ लागली .
           असाच प्रकार नागभीड तालुक्यातील देवपायली येथील श्री यशवंत भिकाजी शेंडे हा मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असे. परंतु कोरोनाच्या थैमानामुळे एक वेळचे अन्न सुद्धा मिळणे कठीण झाले. अशातच त्यांचा मुलगा गणेश शेंडे(२०)याची तब्येत अचानक बिघडली .त्यांनी बाळापूर येथील डॉक्टरला दाखवले असता त्याच्या अन्ननलिकेला छिद्र असल्याचे निष्पन्न झाले . यशवंत शेंडे वर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला .पैसा कुठून आणायचा  अश्याच विवंचनेत तो व त्यांचे कुटुंबिय असायचे. त्यातच पूर्ण भारतभर लॉक डाउन,त्यांनी देवपायली येथील काही प्रतिष्ठित व्यक्ती कडे आपली आपबित्ती सांगितली.
 गावातील काही लोकांनी गावात विचार करून आपणच गावातून वर्गणी गोळा करायची आणि  यशवन्त ला मदत करायची असे ठरविले.
         ठरल्याप्रमाणे श्री दयाराम,भोजराज नवघडे पत्रकार  खेवले,राजेश्वर गुरपुडे ,इंदिराबाई नवघडे ,धनपाल नवघडे, रामचंद्र नवघडे,व इतर गावातील लोकांनी पूर्ण गाव फिरून वर्गणी गोळा केली व सर्व गावकऱ्यांनी यामध्ये आर्थिक मदत केली.पूर्ण गाव मदतीसाठी सरसावला. पैशाची सोय झाली आता लॉक डाउन असल्यामुळे त्याला चंद्रपूरला कसा नेणार असा प्रश्न गावकऱ्यासमोर उभा झाला . गावकऱ्यांनी लगेच  क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे याना सर्व हकीकत सांगितली. गजपुरे यांनी थोडा पण विलंब न लावता ग्रामीण रुग्णालय बाळापूर येथील ॲम्बुलन्सची व्यवस्था करून दिली व स्वतः आर्थिक मदत पण केली .
          त्या मुलाला आज चंद्रपूर येथे शस्त्रक्रियेसाठी हलविण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांचेसह सरपंच व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. या मदतीसाठी धनराज बावनकार ,अशोक कोहपरे तसेच गावातील लोकांचा विशेष सहकार्य लाभले.विशेष म्हणजे याच गावातील लोकांनी १० दिवसाअगोदर कोरोनासाठी पंतप्रधान सहायता निधीमध्ये गावातून वर्गणी करून ५००० रुपये दिले होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment