Ads

शेतीसंबंधित दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू

शेतीसंबंधित दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू


चंद्रपूर दि.12 मे: जिल्ह्यामध्ये 144 कलम लागू असून शेती संबंधित बी-बियाणे खते कीटकनाशके यांच्याशी निगडित उत्पादन व पॅकेजिंग आणि किरकोळ विक्री संबंधित उद्योग,आस्थापना,दुकाने सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहतील. रविवारला सदर दुकाने पूर्णतः बंद राहील,असा आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिला आहे.

शेतीविषयक उत्पादन,सुविधा,आस्थापना संबंधाने पुढील बाबी कार्यरत राहतील

सर्व प्रकारचे शीतगृहे,वखार ,गोदामा संबंधित सेवा,घाऊक वितरणासाठी आणि सदर बाबींशी संबंधित पुरवठा साखळी.कृषी उत्पादन व किमान आधारभूत किंमत यांच्याशी संबंधित कार्य करणारी कृषी उत्पन्न बाजार समिती व राज्य शासनातर्फे अधिकृत असलेले मंडी बाजार विशेषतः कापूस, तुर व धान खरेदी,-विक्री आस्थापना,दुकाने सुरू राहतील.

शेतकरी व शेतमजूर यांचेकडून करण्यात येणारी शेतीविषयक कामे मासेमारी व मत्स्य व्यवसाय संबंधित सर्व कामे व शेती विषयक अवजारे ,यंत्र विक्री व दुरुस्ती संबंधित मान्यताप्राप्त दुकाने,आस्थापना (किमान मनुष्यबळासह).शेती संबंधित यंत्रे,अवजारे चालविण्यासाठी आवश्यक असणारा मजूरवर्ग,केंद्र (कस्टम हायरींग सेंटर-सीएचसी),खते कीटकनाशके व बियाणे यांच्याशी निगडित उत्पादन व पॅकेजिंग आणि किरकोळ विक्री संबंधित उद्योग,आस्थापना,दुकाने.शेतमाल आणि अन्य वस्तूंची आयात निर्यात आणि वाहतूक,राज्यांतर्गत व आंतरराज्यीय कृषी,फलोत्पादन संबंधित अवजारे,यंत्रे जसे पेरणी,कापणी यांची वाहतूक सुरू राहील.

या सर्व आस्थापना व दुकानांमध्ये सामाजिक अंतर, मास्क आणि सॅनीटायझरचा वापर करावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.--
दिनचर्या न्युज

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment