मोठी बातमी : लॉकडाऊन 5 मध्ये असा खुला होणार महाराष्ट्र, जाहीर केली नवी नियमावली

मुंबई, 31 मे : केंद्र सरकारने शनिवारी लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याची घोषणा केल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडून राज्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी ही नियमावली जाहीर केली आहे. केंद्राने जारी केलेल्या नियमांप्रमाणेच राज्य सरकारकडूनही कंटेन्मेंट झोनमध्ये शिथिलता आणलेली नाही. मात्र इतर भागात सूट देण्यात आली असून त्यासाठी काही नियम आणि अटी ठेवलेल्या आहेत.
लॉकडाऊनसाठी काय आहेत महाराष्ट्र सरकारच्या गाईडलाईन्स?
नाईट कर्फ्यू - रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी
खुल्या मैदानात जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र गर्दी करण्यास बंदी
5 जूनपासून काही भागातील दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी
मॉल आणि शॉपिंग कॉम्पेक्सना परवानगी नाही
नियमांचं उल्लंघन केल्यास दुकाने बंद करणार
वाहनांनाही परवानगी, मात्र प्रवासी संख्येला मर्यादा
कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक गोष्टींना परवानगी दिली जाईल. या भागांमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी केली जाईल
या झोनमध्ये येण्यास किंवा बाहेर जाण्यास परवानगी नाही
कन्टेन्मेंट झोनबाबत महापालिकांना अधिकार
दरम्यान, देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोविड-19 चा संसर्ग टाऴण्यासाठी आतापर्यंत 4 टप्प्यांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन 31 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत असेल.
आतापर्यंत कसा वाढवला गेला लॉकडाऊन?
पहिला टप्पा 24 मार्च रोजी 21 दिवसांसाठी होता. त्यानंतर 14 एप्रिल ते 3 मे असा दुसरा टप्पा तर 17 मेपर्यंत तिसरा आणि 31 मेपर्यंत चौथा टप्पा होता. त्यानंतर आता पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
About The Chandrapur Times
0 comments:
Post a Comment