सलून,स्पा,केस कर्तनालय या आस्थापनांच्या वेळेत बदल
सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू
चंद्रपूर,दि. 11 मे: जिल्ह्यात आजपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली असून आता सलून, स्पा, केसकर्तनालय सुद्धा सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील. असा आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिला आहे.
सलून, स्पा,केस कर्तनालय या आस्थापना सुद्धा सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील व रविवारला सदर दुकाने पूर्णता बंद राहतील.
परंतु, आस्थापना धारकांनी दुकानात हॅन्डसॅनीटाजर व त्यांचे कारागीर यांनी नियमित मास्कचे वापर करून एका वेळेस कमाल 1 च्या मर्यादेत सामाजिक अंतर राखून ग्राहकांना प्रवेश द्यावा.
प्रत्येक वेळी साहित्याचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे माहिती फलक दुकानाचे दर्शनी भागावर लावावी आणि दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांची नोंद (नाव, संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक) नोंदवहीत घेण्यात यावी. ग्राहकांनी सलून, केस कर्तनालयात जातांना आपले स्वतःचे नॅपकिन, टॉवेल घेऊन जाणे बंधनकारक असनार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी शक्यतो आवश्यक असेल तरच संबंधित दुकानात जावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दिनचर्या न्युज
0 comments:
Post a Comment