Ads

रस्त्यावर थुंकणाऱ्या ऑटोचालकांना आयुक्तांनी ठोठावला दंड

रस्त्यावर थुंकणाऱ्या ऑटोचालकांना आयुक्तांनी ठोठावला दंड 
दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर - कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून सध्या अनेक गोष्टींवर निर्बंध आणले गेले आहेत. मात्र तरीही काही बहाद्दर राजरोसपणे नियम तोडतांना दिसत आहेत. अशाच एका नियम मोडणाऱ्या थुंकी बहाद्दर ऑटोचालकावर चंद्रपूर महापालिका आयुक्त राजेश मोहीते यांनी स्वतः कारवाई करून दंड ठोठावला. यापुर्वीही शहरात नियमांचे पालन न करणाऱ्या प्रतिष्ठानांवर आयुक्तांनी प्रत्यक्ष कारवाई केली असून सार्वजनिक जागी थुकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई आणखी सक्त करण्याचा इशारा दिला आहे
कोरोना काळात नियमितपणे सकाळच्या सत्रात शहराची पाहणी करणाऱ्या आयुक्त राजेश मोहिते यांना एक ऑटोचालक चालत्या गाडीतुन रस्त्यावर थुंकतांना दिसला, ऑटोचालकाला थांबवत कोरोना काळात रस्त्यावर, सार्वजनीक ठिकाणी थुंकणे किती धोकादायक असु शकते याची जाणीव करून दिली असता, उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या ऑटोचालकाला आयुक्तांनी तेथेच दंड ठोठावला तसेच पुन्हा रस्त्यावर न थुंकण्याची तंबी सुद्धा दिली.
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये याकरीता चंद्रपुर शहरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, काही नागरिक मास्कशिवाय विनाकारण रस्त्यावर गर्दी करीत असल्याने तसेच सार्वजनीक ठिकाणी थुंकत असल्याने थुंकीच्या माध्यमातून कोरोनाच्या फैलावाची शक्यता आहे. शहरात रस्त्यावर थुकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. तरी देखील काही व्यक्तींना कोरोना काळाचे गांभीर्य कळत नाहीये.
दरम्यान, इथून पुढे आता थुंकणाऱ्या नागरिकांची गय केली जाणार नाही. शासन-प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळणं जर शक्य होत नसेल तर त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय त्यांना अद्दल घडणार नाही, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे.


दिनचर्या न्युज 
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment