चंद्रपूर :दिनचर्या न्युज
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा.श्री.आदित्यजी ठाकरे व ओबीसी नेते मा.श्री.कल्याणरावजी दळे साहेब यांच्या आज झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये सलून ची दुकाने लवकरात लवकर चालू करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. व या चर्चेत आर्थिक पॅकेज विषयी सध्यातरी ठोस निर्णय झाला नाही. या चर्चेमध्ये*
▪️ *100 दिवसापासून सलून दुकाने बंद आहेत ते सुरू करण्यासाठी परवानगी सरकार कधी देणार मेघालय मध्ये सोमवारपासून सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.*
▪️ *लॉकडाऊनच्या काळामध्ये घर दुकान भाड्यामुळे अनेक व्यवसायिक अडचणीत येत आहेत त्यांना याबाबत सरकारकडून दिलासा मिळणार आहे का?*
▪️ *सलुन व्यवसायिक बारा बलुतेदार यांना आर्थिक पॅकेज सरकार देणार का? शिक्षणामध्ये सवलती मिळणार का?*
▪️ *आत्महत्या झालेल्या कुटुंबास सहानुभूती दाखवत आपण किंवा आपले मंत्री जातील का, आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत सरकार करणार आहे का?*
▪️ *कवठेमहांकाळ,ईरळी गावातील तरुण नवनाथ साळुंखे चंद्रपूर व इतर जिल्ह्यात 4 आत्महत्या या प्रश्नावर मा.मुख्यमंत्री यांच्या सोबत आपण चर्चा करावी. व बैठक बोलवावी अशी विनंती*
ओबीसी नेते श्री.कल्याणराव दळे यांनी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्याशी केली.या नंतर श्री.आदित्य ठाकरे यांनी कल्याणराव दळे यांना आघाडी सरकार नाभिक समाज व बारा बलुतेदारांच्या मागे सरकार भक्कम असून मदत करण्याचे आश्वासन दिले.
दिनचर्या न्युज
0 comments:
Post a Comment