सलून चे दुकान सुरु करण्यास परवानगी द्या. अथवा आर्थिक पॅकेज जाहिर करा :- कल्याण दळे
चंद्रपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार ने राज्यातील सलून व ब्यूटी पार्लर बंद ठेवन्याचा जो निर्णय या ठिकाणी घेतला त्यावर राज्याचे ओबीसी नेते, महाराष्ट्र बारा बलुतेदार महासंघ व महाराष्ट्र नाभिक महामंडळ व प्रजा लोकशाही परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय कल्याणराव दळे साहेब यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. राज्यातील सलून सुरु करण्याची परवानगी द्या अथवा आर्थिक पॅकेज जाहिर करा. जर राज्य सरकार ने या बाबत महत्वाची भूमिका घेतली नाही तर संपूर्ण राज्य भरात आंदोलनाच्या भूमिकेत नाभिक समाज दिसेल.
लाँकडाऊनच्या कालावधीत मध्ये शासनाच्या सर्व नियम अटींचे पालण करून करत असलेल्या आथिर्क दृष्टय़ा मागास असलेल्या सलून मालक, कारागिरांनवर उपासमारीची वेळ असताना शुध्दा आपले व्यवसाय बंद ठेवून शासनास सर्वतोपरी सहकार्य केले. एवढेच नव्हे तर शासनाच्या अटी-शर्ती पालन करित असताना सुद्धा महाराष्ट्र सरकारने ३१मे रोजी राज्यात सलून दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले.
या निर्णयामुळे नाभिक सलून दुकानदारवर फार मोठे आथिर्क संकट उभे राहिले आहे.
सलुन व्यवसायावर अवलंबून असणारे कुटुंबांना भूकमारीची पाळी आली आहे. सलून दुकान बंद राहीलेतर सलून चालक, कारागिरांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
म्हणून सरकारने सलून दुकानदारवर काही बाबींमध्ये शिथिलता, अटी-शर्ती लावून दुकान सुरू करण्यास परवानगी द्यावी किंवा आर्थिक साह्य करावे.
सलुन बंद बाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र नाभिक महामंडळा च्या वतिने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
दिनचर्या न्युज
0 comments:
Post a Comment