Ads

अवैध वाळू उत्खननावर नियंत्रण आणण्यासाठी संयुक्त पथकामार्फत कारवाई करा : गृहमंत्री नागपूर विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत ना. अनिल देशमुख यांचे निर्देश ना. विजय वडेट्टीवार, ना. नितीन राऊत यांचाही बैठकीमध्ये सहभाग



अवैध वाळू उत्खननावर नियंत्रण आणण्यासाठी

संयुक्त पथकामार्फत कारवाई करा : गृहमंत्री

नागपूर विभागातील अधिकाऱ्यांच्या

बैठकीत ना. अनिल देशमुख यांचे निर्देश

ना. विजय वडेट्टीवार, ना. नितीन राऊत यांचाही बैठकीमध्ये सहभाग



चंद्रपूर, दि.15 जून : नागपूर विभागातील अवैध वाळू उत्खननाबाबत वाढत्या तक्रारीवर नियंत्रण आणण्यासाठी महसूल, पोलीस व परिवहन विभागामार्फत संयुक्तरीत्या कारवाई करण्यात यावी. यासाठी पथकांची निर्मिती करण्यात यावी,असे निर्देश राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे दिले.

नागपूर विभागातील वाळू वितरणाच्या संदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्यातून विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. काही ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या चार जिल्ह्यातील वाळू वितरणाच्या बाबत आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापनइतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवारराज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितीन राऊत तसेच आमदार आशिष जैस्वाल सहभागी झाले होते. चंद्रपूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डीअतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकरउपजिल्हाधिकारी पुनर्वसन जे. पी.लोंढेजिल्हा खनिज अधिकारी गजानन कामडेउपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस.पी. फासेउपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड चंद्रपूरक्रांती डोंबे ब्रम्हपुरीप्रकाश संकपाळ चिमूरसुभाष शिंदे वरोरासंजयकुमार ढवळे बल्लारपूरमहादेव खेडकर मूल यांचा समावेश होता.

जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी यावेळी जिल्ह्यातील उपलब्ध असणारे वाळू बेट व यासंदर्भात घेतलेली सार्वजनिक सुनावणीमान्यतेसाठी पाठविण्यात आलेला प्रस्तावग्राम दक्षता समितीचे गठणभरारी पथकाची निर्मितीचाळीस घाटांवर सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव, शस्त्रधारी पोलिसांची नियुक्तीड्रोन कॅमेराद्वारे पहाणी आणि जिल्ह्यात आतापर्यंत दाखल करण्यात आलेले गुन्हेयाबाबतची गेल्या दोन वर्षाची माहिती या बैठकीत सादर केली.

चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी या बैठकीमध्ये भंडारानागपूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाळूचे ट्रक अवैधरित्या उभे असल्याचे आढळून आल्याचे सांगितले. त्यांनी यावेळी गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वहन अवैधरित्या होत असल्याचे लक्षात आणून देत नाकाबंदी वाढविण्याची सूचना केली.तसेच टोल नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेअशी सूचना केली. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देखील भंडारा जिल्ह्यातील उत्खननाबाबत आक्षेप नोंदविला.

शेवटी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रेती आणि गौण खनिज सुलभरीत्या उपलब्ध होण्यासाठी आवश्यक असणारी कारवाई प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी समन्वय ठेवून करावीअसे निर्देश दिले. तसेच अवैधरीत्या रेती उत्खनन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. प्रचलित कायद्यानुसार दंड वसुलीची कार्यवाही करावी,वारंवार ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे अशांची मक्तेदारी मोडण्यासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment