Ads

राज्य शासनाकडे वर्ग केलेल्या जि.प.कृषी विभागाच्या योजना पुर्ववत जिल्हापरिषदेकडे वळते करण्याची मागणी चंद्रपुर जि.प.सदस्य संजय गजपुरे

राज्य शासनाकडे वर्ग केलेल्या जि.प.कृषी विभागाच्या योजना पुर्ववत जिल्हापरिषदेकडे वळते करण्याची मागणी चंद्रपुर जि.प.सदस्य संजय गजपुरे

यांनी आज राज्याचे कृषीमंत्री नाम.दादाजी भुसे यांचेकडे केली.*

नागभीड :दिनचर्या न्युज
कृषी संजिवनी सप्ताहानिमित्य आज नागभीड तालुक्यातील मेंढा ( कि. ) येथे शेतकऱ्यांशी संवाद साधण्याकरीता कृषीमंत्री आले असतांना संजय गजपुरे यांनी याबाबत त्यांचेशी चर्चा केली.जिल्हा परिषद कृषी विभागातील अभियांत्रिकिकरण योजना, गळीत धान्य विकास योजना , तृण धान्य/मका विकास योजना, गुणनियंत्रण , कृषी सेवा परवाने व नुतणीकरण , अनेक अनुदान योजना , ट्रॅक्टर चलीत अवजारे, अशा विविध योजना राज्य कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. आता केवळ सेस फंडातील निधीमधुन योजना आणी विशेष घटक योजना राहिल्या असल्याने जि.प.चा कृषी विभाग शेतकऱ्यांना योजना देण्यास असमर्थ ठरत आहे.
खरे तर राज्याच्या कृषी विभागाचा थेट शेतकऱ्यांशी संबंध नसतो. ग्रामपंचायत, पंचायत समिती , जिल्हापरिषद या माध्यमातुन शेतकरी प्रामुख्याने जोडला असतो. जिल्हापरिषद ही ग्रामिण भागाची केंद्रबिंदु आहे. त्यामुळे योजना प्रभावीपणे राबविणे व तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्हापरिषदेच्या कृषी विभागामार्फत होणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी राज्याचे कृषीमंत्री नाम. दादाजी भुसे यांचेशी चर्चा करतांना केली , व लवकरात लवकर राज्याकडे वर्ग केलेल्या योजना पुर्ववत जि.प.कृषी विभागाकडे वळते करण्याची आग्रही मागणी केली.

दिनचर्या न्युज
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment