ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ चंद्रपूरमध्ये वृक्षारोपण!
चंद्रपूर प्रतिनिधी :-
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी सेल जिल्हा चंद्रपूर शहराच्या वतीने इंटक भवन (सुशिला भवन) बंगाली कॅम्प बायपास रोड येथे विविध प्रकारच्या वृक्षांच्या रोपांची लागवड करून ना. अजितदादाचा वाढ दिवस साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुडेँ, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य., ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट हिराचंद बोरकुटे, प्रदेश सरचिटणीस दलित मित्र व आदिवासी सेवक डी. के. आरिकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. पंकज पवार, शहर अध्यक्ष रवी ठाकरे, कार्याध्यक्ष माणिक लोणकर, ग्राहक सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. देव किन्नाके, सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे, ओबीसी सेलचे जिल्हा संघटक दिनेश एकवनकर, नगरसेवक राजेश अड्डुर, मनशाराम राऊत, महासचिव राणी येलेकर, वनश्री मेश्राम, सौ. धर्मपूरीवार मॅडम, आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment