पुर्वा खेरकर हिला राष्ट्रीय स्तरावर सॉफ्टबेस बॉल पंच व तांत्रिक अधिकारी होण्याचा बहुमान
चंद्रपूर :- दिनचर्या न्युज
जागतिक पातळीवर महामारी चे संकट उद्भवले असताना देखील शिक्षणाचे दार उघडे आहे याची प्रचिलीती हि ऑनलाइन शिक्षण ने दिली आहे. या शिक्षण पद्धतीत शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग देखील मागे नाही असे दिसते आहे.
भारतीय सॉफ्टबेस बॉल संघटने द्वारे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील पंच व तांत्रिक अधिकारी कार्यशाळा व परिक्षेसाठी राजुरा सारख्या ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रातील कार्यरत शारीरिक शिक्षिका कु पुर्वा गणेशराव खेरकर हिने सहभाग घेतला असून तिने हि परीक्षा अव्वल गुणांनी उत्तीर्ण देखील केली आहे. सॉफ्टबेस बॉल खेळातील जिल्हातुन प्रथमच पंच व तांत्रिक अधिकारी होण्याचा बहुमान पुर्वा हिला प्राप्त झालाय.
विविध क्रीडा संघटनेत कार्यरत पुर्वा खेरकर हीच्या यशा बद्दल भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचा अध्यक्षा श्रीमती रोहिणी बाड, सचिव श्री नामदेव शिंदे तसेच महाराष्ट्र सॉफ्टबेस बॉल संघटनेचे सचिव श्री बाळासाहेब रनशूर यांनी अभिनंदन केले.
पुर्वा हि नाभिक कन्या असून आजपर्यंत अनेक स्पर्धामध्ये पंच म्हणून काम केले आहे.
नाभिक समाजासाठी हि अभिमानास्पद बाब आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा चंद्रपूर कडून हार्दिक अभिनंदन.
0 comments:
Post a Comment