Ads

ग्रामपंचायत नकोडाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याबद्दल संरपच तथा सदस्य यांना निरोप, तर अमोल उघडे प्रशासक म्हणून रूजू!






ग्रामपंचायत नकोडाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याबद्दल संरपच तथा सदस्य यांना निरोप, तर अमोल उघडे प्रशासक म्हणून रूजू!

दिनचर्या न्युज :चंद्रपूर
ग्रामपंचायत नकोडाचा आज दि.१८ सप्टेंबर ला सरपंच सौ. तनुश्री किरण बांदुरकर यांच्या नेतृत्वात अत्यंत नियोजनबद्ध, विकासात्मक आणि संपूर्ण यशस्वी कार्यकाळ संपल्याबद्दल सरपंच तथा सदस्य गण यांना शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून निरोप देण्यात आला. तसेच प्रशासक म्हणून श्री. अमोल उघडे यांचे स्वागत मान. ब्रिजभूषण पाझारे, सभापती, समाजकल्याण समिती, तथा सदस्य जि. प. चंद्रपूर, पं. स. सदस्या सौ. सविता ऋषी कोवे, सरपंच सौ. तनुश्री किरण बांदुरकर ग्राम पंचायत सदस्य श्री. किरण बांदूरकर, सौ. ममता उरकुडे, श्रीअंजय्या गोणपेल्लीवार, संगीता पेरकावार, नरेश एलकापेल्ली, माजी सरपंच ऋषी कोवे, यांचे हस्ते करण्यात आले. तसेच निरोप संभारभाचे औचित्य साधून ग्राम पंचायत कर्मचारी, सफाई कामगार, पाणी पुरवठा कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, वायरमन यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार (माजी अर्थ, नियोजन व वने मंत्री, आमदार, बल्लारपूर क्षेत्र) यांनी घुगुस सभेमध्ये नकोडा गावाला एक कोटी रुपयांचे सामाजिक सभागृह मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची फलित म्हणून २५/१५ अंतर्गत मंजूर १ कोटी रुपयांचे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच समाज कल्याण अंतर्गत सावित्रीबाई फुले बौद्ध महिला मंडळ, नकोडा यांना स्पीकर सेट चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी खालील व्यक्तिमत्त्वांनी आपले मनोगत मांडले.
बाळकृष्ण झाडे (समाजसेवक) - महिला उत्तम प्रकारे कार्य करू शकते याचे उत्तम उदाहरण सरपंच ताईंनी करून दाखविले.
ऋषी कांबळे (माजी सदस्य ग्रामपंचायत नकोडा) - सर्वांना समजून घेतले प्रत्येकाला न्याय दिला.
ममता उरकुडे (सदस्य, ग्रामपंचायत नकोडा) - अविरोध सरपंच होण्याचा मान मिळवला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आला स्पीकर देऊन सफाई कर्मचारी व प्रत्येकाला न्याय दिला.
महादेव वाघमारे (ज्येष्ठ नागरिक तथा समाजसेवक) - अहिल्याबाई होळकर सौंदर्यीकरण करण्यात आले. lockdown काळात प्रत्येकाला न्याय मिळेल याची जातीने काळजी घेतली. भोजन पुरविण्यासाठी हिरहिरीने सहभाग घेतला.
सौ सविता ऋषी कोवे(सदस्य, पंचायत समिती चंद्रपूर) - पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायतीचे ठराव योग्यवेळी व व कोणताही विलंब न करता टाकण्याचे काम केले व गावाचा विकास केला. स्पूर्तीने ठरावाची प्रत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पोहोचवली.
सौ.तनुश्री किरण बांदुरकर (सरपंच, ग्रामपंचायत नकोडा) - मला नकोडा ग्रामस्थांनी दोन प्रभागातून भरगोस मतांनी निवडून दिले. आणि यांच्या सहकार्याने सरपंच पद भूषणाच्या सन्मान मला मिळाला. एक महिला सरपंच म्हणून मला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी मिळाली तरी सर्व महिलांना सांगू इच्छितो ही महिलांनी चूल आणि मूल या पुरतीच मर्यादित न राहता सामाजिक राजकीय अशा प्रत्येक क्षेत्रात समोर येऊन गावाच्या देशाचा कल्याणाकरिता नेतृत्व करावे. तसेच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी नकोडा ग्रामवासी यांचे विकास कामाकरिता वेळोवेळी सहकार्य लाभले त्यामुळे यांचे मी आभार मानते.
श्री ब्रिज भूषण पाझारे (माजी सभापती, समाज कल्याण समिती तथा सदस्य जिल्हा परिषद, चंद्रपूर - या पाच वर्षांमध्ये सौ. तनुश्री किरण बांदूरकर यांनी गावाच्या विकासाकरिता पक्षपात न करता कोणताही भेदभाव न करता सर्व गावकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये अध्यक्षपदावर असल्यामुळे गावाच्या विकास करण्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतले. गावामध्ये नवनवे उपक्रम राबविले यात घंटागाडी वारे घरोघरी जाऊन केरकचरा उचलण्याचा नवीन उपक्रम राबविला. शासनाचा जीआर येण्याआधीच ग्रामपंचायत अंतर्गत माजी सैनिक माजी सैनिकांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफ करण्यात आले. मयत झालेल्या कुटुंबाला अंत्यविधी करिता ग्रामपंचायत अंतर्गत तीन हजार रुपयाची अनुदान मंजूर केले. सर्व धार्मिक स्थळांचा विकास व सौंदर्यीकरण करण्यात आले गावात खंड न पडता शुद्ध पाणीपुरवठा नेहमी सुरळीत सुरू ठेवण्याचे कार्य यांनी केले. गावातील रुग्णांसाठी ग्रामपंचायत अंतर्गत 24 तास रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नागरिकांच्या सोयीसाठी बाजारो त्यांना शेडचे बांधकाम, शुद्ध पाण्यासाठी आरो बांधकाम करण्यात आले. नकोडा वार्ड क्रमांक चार व पाच येथील कुटुंब मागील पन्नास वर्षापासून हक्काच्या विजपुरवठा पासून वंचित होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी त्या सर्व कुटुंबांना वीज मीटर पुरविण्याचे प्रयत्न केला होतो यशस्वीरित्या पूर्ण झाला. कुडाळ येथील वर्धा व निरगुडा नदीवरील संगमावर समशान भूमी बांधकाम करून त्या समशानभूमी ला राजघाट येना मंत्र करून सदर ठिकाणी शोकसभा सभागृह व उत्तम सौंदर्यीकरण करण्यात आले. नकोडा गावालगत असलेल्या रस्त्यावरून वे कोली कंपनीतून जडवाहतूक नेहमी चालू असायची. यामुळे गावातील नागरिकांना प्रदूषणाचा खूप त्रास व्हायचा व अपघात घडत असे. तेव्हा अनेक चक्काजाम आंदोलने करून कंपनीला सदर रस्ता बंद करण्यास भाग पाडले व सदर रस्ता गावाबाहेरून डायव्हर्ट करण्यात आला. यामुळे नागरिकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले तसेच ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक करिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर केल्याप्रमाणे सर्व कामे करण्यात आली त्यापेक्षा जास्त विकास कामे करण्यात आली. (उदाहरणात- व्यायाम शाळा, राशन दुकान, हायमास्ट लाईट, प्रत्येक वार्डात चौकात सिमेंट खुर्च्या, डस्टबिन) पिंपळगावात विविध जाती-धर्माचे कार्यक्रम आयोजित करण्यात आली. गावकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी आरोग्य शिबिर चे आयोजन करण्यात आली. एसीसी कंपनी अंतर्गत साप्ताहिक ओपीडी गावातील नागरिकांना उपलब्ध करून दिली. सरपंच ताईंनी वेळोवेळी जनसामान्यांची सेवा केली. त्यांच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्याच्या पुरेपूर प्रयत्न केला. याकरिता त्यांचे पती श्री किरण बांदुरकर यांच्या सुद्धा मोलाचा वाटा आहे. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक ऋषी कांबळे, बाळकृष्ण झाडे, महादेव वाघमारे, मधुकर बोबडे, शामराव घोडाम, माजी सैनिक संभाशिव देवतळे, नितीन मांदाळे, सोमनाथ वाटणे, ईश्वर बांदुरकर, शंकर बांदुरकर, विनोद हेपट,दिनेश सिडाम, स्वामी विवेकानंद युवा मंच अध्यक्ष मंगेश राजगडकर, रजत तुरणकर, राकेश धुळे, कपिल आकुळवर, राकेश नवले, अनिकेत गेडाम, जईंद्र मंदे, महेश राजगडकर, कुणाल यातावर, अंकित कुमार, आकाश गेडाम, मयुर बावणे, राहुल पिंपळकर, युनूस शेख, छगन गेडाम विनोद चतुरकर विलास मुक्के, इम्रान शेख, तुमाने ताई, भलामे ताई, हेकाड ताई, मारबते ताई व नकोडा ग्रामस्थ उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment