Ads

महाराष्ट्र मेट्रो न्यूज पोर्टल चे संपादक रोहित तूराणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला!महाराष्ट्र मेट्रो न्यूज पोर्टल चे संपादक रोहित तूराणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला

दिनचर्या न्युज, चंद्रपूर

शहरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली असून अवैध दारू विक्री करणाऱ्यांना पोलिसांच्या हप्तेखोरी धोरणामुळे जणू आता सरक्षण मिळायला लागले आहे. अशाच इंदिरा नगर येथील पिंटू व प्रदीप वाढई या अवैध दारू विक्री करणाऱ्यांनी चक्क तलवारीने महाराष्ट्र मेट्रो न्यूज पोर्टल चे संपादक रोहित तूराणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची खळबळजनक घटना काल रात्री ९.०० च्या दरम्यान इंदिरा नगर येथे घडली. या हल्ल्यात रोहित तूराणकर यांच्या आई ला सुद्धा दुखापत झाली असून जर वेळीच त्या ठिकाणी लोक धावून गेले नसते तर आरोपीने जीवच घेतला असता अशी चर्चा आहे. आरोपी हल्ला करुंण पसार झाल्यानंतर काही तासातच एका आरोपीला पकडले तर दुसरा आरोपी फरार असल्याची माहिती आहे. या अवैध दारूचे धंदे करणाऱ्या दोघांना विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना तडीपार करण्यात यावे अशी मागणी होत आहे,या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक हाके यांच्या नेत्रुत्वात सुरू असून दुसऱ्या आरोपीला लवकरच पकडून पी सी आर घेण्यात येईल असे पोलिस सूत्रांकडून कळते …

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment