अन्यायग्रस्त नगरसेवकांचा एका राष्ट्रीय पक्षात प्रवेश?
चंद्रपूर :- दिनचर्या न्युज
चंद्रपूर महानगरपालिका मध्ये होत असलेल्या स्थायी समितीच्या सभापती पदासाठी एका निष्ठावान कार्यकर्त्याला डावलून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ओबीसीच्या नगरसेवकांना डावलून ओपन प्रवर्गातील अल्प संख्याक नगरसेवकाला स्थायी समिती सभापतीचे पद अचानक दिला गेल्याने दुखावलेल्या नगरसेवकाकडे एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांची चढाओढ सुरू असून त्यांचा पक्षात प्रवेश होण्याची सर्वीकडे चर्चा सुरू आहे. महानगरपालिकेमधील अनेक नगरसेवकाचे पूर्वी गट नेता असलेले वसंत देशमुख यांच्या पाठीमागे खंबीर असणारे अनेक नगरसेवक एका राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याचे चर्चिले जात आहे.तसेच या बैठकीला सुरवात झाली असून लवकरच पक्ष प्रवेश होण्याची सर्वीकडे चर्चा सुरू झाली आहे.
गुप्त माहिती नुसार मनपाच्या काही नगरसेवकांनी सभापती निवडीसाठी विरोधात जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अखेर भाजपाची गनीमिकाव्याची रणनिती ही ओबीसीच्या विरोधात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
0 comments:
Post a Comment