खासदार बाळू धानोरकर यांच्या उपस्थितीत कोरोना सहायता कक्षाचे उद्घाटन
चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांच्या पुढाकार
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : जगात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट उद्भवली आहे. मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्य शासन मोठ्या प्रमाणात उपायोजना करीत आहे. परंतु त्या सोबतच काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुद्धां कोरोना योध्याची भूमिका वटविण्याकरिता पुढे येण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांचा पुढाकारातून साकारण्याकत आलेल्या कोरोना सहायता कक्षाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या कोरोना सहायता कक्षाचे उद्घाटन पाच कोरोना योद्धा महिलांचा हस्ते कारण्याकत आले. या प्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती प्रित्यर्थ त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष चंद्रपुर शहर जिल्हा कॉंग्रेस कमेटी रितेश (रामु) तिवारी, अध्यक्ष चंद्रपुर ग्रामीण जिल्हा कॉंग्रेस कमेटी प्रकाश देवतळे, कामगार नेते के के सिंह, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा सुनीताताई अग्रवाल, नगरसेविका सुनीता लोढ़िया, नगरसेवक प्रशांत दानव, माजी नगरसेवक प्रवीण पड़वेकर, काँग्रेस पदाधिकारी अश्विनी खोब्रागाडे, अनुताई दहेगावकर, प्रसन्ना शिरवार, कुणाल चहारे, यूसुफ़ भाई, सुनील पाटील, उमाकांत धांडे, नरेंद्र बोबडेसर, मोहन डोंगरे, रुपेश वासेकर, रमीज़ शेख, सूर्या अड़बाले, केतन दुर्सेलवार, प्रीति शाह, मोणू रामटेके, कादर शेख, आकाश कोडपे, प्रिया चंदेल, शाहीन परवीन, दिनेश शिरपुरकर, विष्णु मिटकरी, कुणाल रामटेके, नवशाद शेख, मोनू रामटेके, इरफ़ान शेख, तृषार पड़वेकर, अख्तर सिद्दीकी, अन्नू जंगम, धरमु तिवारी, मीनल शर्मा, आकाश तिवारी, कृष्णा यादव यांची उपस्थिती होती. यावेळी सीता श्याम हजारे, छाया पोखारे, रक्ष्मी नगराळे, सीमा वासमवार या कोरोना योध्यांकडून कोरोना सहाय्यता केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
संकटकाळात लोकांच्या मदतीला धावून जाणारा काँग्रेस पक्ष या संकटातही सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून मोठ्या प्रमाणात जनजागरण करून कोविड रुग्णांना वैद्यकीय सहायता पुरविण्यासाठी सज्ज आहे. यासाठी कोविडमुक्त गाव व वॉर्ड ही मोहीम राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील गिरनार चौकातील पक्ष कार्यालयात कोरोना सहायता कक्ष सुरू करण्यात आले आहे. या कक्षाचे उद्घाटन कोरोना योद्ध्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या केंद्राच्या माध्यमातून सामान्य जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.
0 comments:
Post a Comment