Ads

विकासासाठी चंद्रपूर शहर ब्रॉडगेज मेट्रोसेवेशी जोडणार - आमदार सुधीर मुनगंटीवार chandrapur





विकासासाठी चंद्रपूर शहर ब्रॉडगेज मेट्रोसेवेशी जोडणार

शहराच्या विकासासाठी नागरिकांनी सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे

◼️आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

◼️वडगाव प्रभाग क्रमांक आठ मधील विविध कामांचे भूमिपूजन; चिन्मय उद्यानाचा लोकार्पण सोहळा

दिनचर्या न्युज :- 
चंद्रपूर/प्रतिनिधी
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास अप्रतिम सुरू आहे. हा विकास आणखी भविष्यातही व्हावा, यासाठी नागरिकांनी आपले दायित्व समजून सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे, असे आवाहन लोकलेखा समितीचे अध्यक्ष, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर शहराच्या विकासात प्रगती व्हावी, यासाठी चंद्रपूर आणि बल्लारपूर ही दोन शहरे ब्रॉडगेज मेट्रो सेवेतून नागपूरशी जोडण्यात येत असल्याची माहितीदेखील यावेळी त्यांनी दिली.


वङगाव प्रभाग क्रमांक आठ मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि चिन्मय उद्यानाचा लोकार्पण सोहळा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शनिवार ता. १७ जुलै रोजी पार पडला.

यावेळी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेता संदीप आवारी, झोन सभापती ॲड. राहुल घोटेकर, प्रभागातील नगरसेवक देवानंद वाढई, नगरसेवक पप्पू देशमुख, नगरसेविका सुनिता लोढीया, नगरसेवक सुभाष कासनगोटुवार, नगरसेविका छबूताई वैरागडे, नगरसेवक संजय कंचर्लावार यांची उपस्थिती होती.

यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेने नवीन योजना आखण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज आहे. पालिकेच्या माध्यमातून आझाद बगीच्या नूतनीकरण, पिण्याच्या पाण्यासाठी अमृत योजना, कोरोणाच्या काळामध्ये केलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत. येत्या काळातही महानगरपालिका आपली जबाबदारी पूर्णपणे पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी महापौर राखी संजय कंचलवार यांनी चंद्रपूर शहराच्या विकासासाठी आजवर झालेल्या प्रयत्नांचा लेखाजोखा मांडला. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नातून चंद्रपूर शहरात मिळालेल्या निधीबद्दल त्यांनी आभार मानले.
तत्पूर्वी सर्वप्रथम वडगाव प्रभागातील चिन्मय मिशनच्या उद्यानाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या उद्यानात विशेष तरतूद निधी अंतर्गत ग्रीन जिम उभारण्यात आली आहे. स्वर्गीय सौ. चांगुनाबाई मुनगंटीवार सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात चिन्मय मिशनच्या ब्रह्मचारी प्रेरणाजी चैतन्य यांनी आपल्या मनोगतात चिन्मय मिशनच्या विविध उपक्रमासंदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश्वर अल्लुरवार यांनी, संचालन डॉ. आरती जोशी यांनी केले. आभार सुनील सिद्धमशेट्टीवर यांनी मानले.
या कार्यक्रमानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष निधीतून साकारण्यात आलेल्या संत गाडगेबाबा उद्यानाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर वडगाव प्रभाग क्रमांक आठमध्ये लक्ष्मी नगर ते वडगाव सिमेंट काँक्रीट रस्त्याचे व भूमिगत नाल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले. धनोजे कुणबी समाज सभागृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ॲड. पुरूषोत्तम सातपुते यांच्यासह या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती ॲङ राहुल घोटेकर यांनी, तर संचालन स्वाती बेतावार यांनी केले. विविध ठिकाणी पार पडलेल्या या कार्यक्रमाला वडगाव प्रभागातील नागरिकांची उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment