Ads

चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बारा बलुतेदार सेलची बैठक!




चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बारा बलुतेदार सेलची बैठक!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बारा बलुतेदार सेलची बैठक माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या विचारातून तळागाळातील वंचित ओबीसी बारा बलुतेदार समाजातील समाजाला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बारा बलुतेदार सेलची महाराष्ट्रभर उभारणी करण्यासाठी मा. विजयराव पोहनकर बारा बलुतेदार सेल प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत. चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी विचार मंच बारा बलुतेदार सोबत. जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या उपस्थित आढावा बैठक घेण्यात आली.
विजयराव पोहनकर म्हणाले की, बलुतेदार अलुतेदार हा एक समाजातील मागासलेला घटक असून पिढ्यानपिढ्या या समाजावर उच्चवर्णीयकडून पिळवणूक झाल्याने या 16 अलुतेदार व साडेबारा बलुतेदार जातीतील समाजावर एक प्रकारचा पारंपारिक व्यवसायावार गदा आणली गेली.
पूर्वी वस्तूला वस्तू मिळण्याची पद्धत समाजात असायची. सर्वात पहिला व्यवसाय करणारा माणूस असेल तर तो बाराबलुतेदार हा होता. औद्योगिक कारखाने तयार झाल्याने बलुतेदारीचा -हास झाला. इतर समाजाने बलुतेदारांच्या व्यवसायावर आपली हुकूमत गाजवली.
मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बारा बलुतेदार सेलच्या माध्यमातून राज्यभरात बलुतेदारांना न्याय मिळण्यासाठी, आर्थिक दृष्ट्या मदत मिळण्यासाठी, व्यवसाय बळकट करण्यासाठी ,शासना कडून बाराबलुतेदार समाज सक्षम करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आपल्याला एकत्र येऊन काम करायची गरज आहे . पोहनकर यांनी सांगितले.






याच बैठकीमध्ये डॉक्टर देव किन्नाके, आणि एकनाथराव किन्नाके यांच्या नेतृत्वात बारा बलुतेदार सेलचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केल्या .
या बैठकीत ज्येष्ठ नेते हिराचंद बोरकुटे, दलित मित्र, आदिवासी सेवक , ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटनिस बहुजन ललकारचे संपादक डी. के.आरिकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष सौ. बेबीताई उईके, जिल्हा शहराध्यक्ष राजीव कक्कड, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष माणिक लोणकर, सुनील  दहेगावकर ,सुधाकरजी कातकर, दिनचर्याचे संपादक दिनेश एकवनकर, दीपक भुजाडे, नागेश्वर निंबाळकर, रवींद्र नागपुरे, कृष्णा तुराणकर, शशिकांत चन्ने,  दिनकर देरकर, जयंत  मुत्यालवार, जितेंद्र पिपरे, संतोष खडके, अक्षय ठोंबरे, संजय तुरीले, तालुका अध्यक्ष ओबीसी सेल मनोहर जाधव  यांच्या उपस्थितीत बारा बलुतेदार सेल ची बैठक संपन्न झाली.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment