Ads

वाढत्या महागाई विरोधात महिला काँग्रेस च्या नेतृवात काँग्रेस चे जनआंदोलन.

चंद्रपुर :-
जानेवारी पासून आजपर्यंत तब्बल २५० रुपयांची दरवाढ सिलिंडर मध्ये करण्यात आली आहे त्यामुळे सामान्यांसाठी ही दिवाळी नसून गरिबांचा दिवाळा निघाला आहे त्या साठीच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृवात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, सेवादल महिला काँग्रेस, सेवा फाऊंडेशन काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित काँग्रेस च्या महिला पदाधिकर्यांनी चूल पेटवून गरम पाण्यात चकल्या तळल्या त्याच बरोबर पणत्या मध्ये पाणी भरून वाढत्या खाद्य तेलाच्या दरवाढि च्या विरोधात निषेध करण्यात आला. गोरगरिबांचे जीवन वाढत्या महागाई मुळे उद्धवस्त झाले आहे, चुलीमुळे ४०० सिगारेट चा धुव्वा महिलेच्या शरीरात जातो म्हणून मोदींनी उज्वला गॅस योजना आणली परंतु त्याचे देखील सिलिंडर आज १००० च्या घरात असल्यामुळे महिला पुन्हा चुलीकडे वळल्या आहेत. ना खाऊंगा ना खाने दूंगा असे मोदीजी म्हणाले होते पण त्याच बरोबर गरिबांको जिने नही दूंगा हे देखील मनातल्या मनात म्हणाले असतील म्हणून च आज महागाई चा इतका कडेलोट करून त्यांनी गोरगरिबांचे जिने मुश्किल केले आहे. गृहिणीच्या मनाला घाव या मोदी सरकारने दिला आहे कारण लेकराला गॅस आणि किराणा सामानाच्या दरवाढीमुळे उपाशी ठेवण्याची वेळ या मोदी सरकारने आणली आहे म्हणून च बांगड्यांचा अहेर मोदी सरकारला पाठवण्यात येणार आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी यावेळी केली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना वाढत्या महागाई विरोधात निवेदन देण्यात आले. या आंदोलनाला मतीन कुरेशी,महिला काँग्रेस च्या उपाध्यक्षा सुनीता धोटे, सेवा फाऊंडेशन चेजिल्हाध्यक्ष हाजी अली, शहर अध्यक्ष शीतल कातकर, जिल्हाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, शहर अध्यक्षा लता बारापात्रे, असंघटित कामगार सेल चे जिल्हाध्यक्ष संदीप सीडाम, नगरसेविका सुनीता लोढिया ,नंदू नागरकर, संगीता भोयर, प्रशांत दानव, बल्लारपूर महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्षा मेघा भाले,तालुकाध्यक्षा अफसना
सय्यद,राजुऱ्या च्या शहर अध्यक्षा संध्या चांदेकर, पूनम गीरसाळवे, गोंडपीपरी तालुकाध्यक्षा रेखा रामटेके, उषा धांडे, एजाज कुरेशी,शाहीन शेख, परवीन सय्यद, वाणी डारला,प्रकाश अधिकारी, सुनील चौहान, ब्रिजेश तामगडे, सचिन रामटेके, विनोद कार्लेकर,नाहीद काझी, उमाकांत धांडे, मोनू रामटेके, मंगला शिवरकर, सुष्मा बनसोड, सुनंदा संग्रामे, रोशन दंतेलवार, साई सय्यद, पूजा अहुजा, कल्पना चक्रवर्ती, मालवती चक्रवर्ती, रोनी रॉय, प्रकाश, पायल खांडेकर यांची उपस्थिती होती.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment