Ads

जेनेरीक औषधी गोरगरीबांसाठी वरदान - हंसराज अहीर

चंद्रपूर : -
प्रधानमंत्राी नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘‘प्रधानमंत्राी जनऔषधी योजना’’ ही सर्वसामान्य, गोरगरीब लोकांसाठी वरदान ठरली आहे. आज जेनेरीक औषधांकडे रूग्णांचा वाढता कल हे या योजनेचे फार मोठे यश असुन ही औषधी अॅलोपॅथी औषधांच्या तुलनेत 30 ते 70 टक्के स्वस्तात उपलब्ध होत असल्याने व या औषधांची गुणवत्ता सुध्दा उच्च प्रतिची असल्याने नागरीकांनी जेनेरीक औषधांचा अधिकाधिक वापर करून केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी केले.
दि. 30 आॅक्टो. रोजी शामनगर येथील घुमडे जेनेरीक फार्मा तसेच बापटनगरातील केअर जेनेरीक प्लस फार्मा औषधालयाचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. आपल्या संबोधनात हंसराज अहीर यांनी शामनगर सारख्या स्लम क्षेत्रामध्ये जेनेरीक औषधांचे दुकान सुरू झाल्याने याचा लाभ तळागाळातील रूग्णांच्या स्वास्थ्यासाठी होणार असुन लोकांच्या खिशाला या औषधांचा खर्च परवडणारा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.

चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे 39 जेनेरीक स्टोअर्स सुरू असुन या स्टोअर्सला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. या दोन्ही जेनेरीक औषधांच्या संचालकांनी लोकहितास्तव उचललेले पाऊल स्वागतार्ह असल्याचे सांगत लोकसेवा हे ध्येय ठेवून त्यांनी रूग्णांच्या सेवेत सतत योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी या लोकार्पण प्रसंगी केले. या कार्यक्रमास चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. राखीताई कंचर्लावार, मनपा गटनेत्या सौ. जयश्री जुमडे, मनपा सभागृह नेते देवानंद वाढई, जेनेरीक प्लस फार्मासीचे संचालक संतोष शेडगे, नगरसेवक प्रदीप देशमुख, डाॅ. प्रविन पंत, जेनेरीक प्लस फार्मासीचे क्षेत्राीय प्रमुख रविकांत वाघाडे, डाॅ. रविभुषण, डाॅ. शुभश्री भट्टाचार्य, डाॅ. श्रध्दा माटुरवार, डाॅ. मनोज कुपरने, माजी नगरसेवकव्दय मनोरंजन राॅय, महेंद्र जुमडे यांचेसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment