राजुरा २३ डिसेंबर :-
बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या दानिश शकील शेख या विद्यार्थ्याने ख्रिसमस नाताळ निमित्याने सॅन्टाक्लॉज चे सुंदर चित्र रेखाटले. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचे चित्रकलेचे प्रशिक्षण न घेता हा विद्यार्थी वेगवेगळे चित्र रेखाटतो.
Danish Shakeel Sheikh created a picture of Santa Claus. त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगत सिंग, महात्मा गांधी अशा समाजसुधारक, क्रांतिकारकांचे चित्र रेखाटले आहे. त्याला अभ्यासाव्यतिरिक्त चित्रकलेची आवड असून तो सतत नवनवीन चित्र काढत असतो. याकरिता त्याला राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख शिक्षक बादल बेले यांनी प्रोत्साहन दिले असून पुढेही त्याला चित्रकलेची आवड पूर्ण करण्यासाठी लागणारे साहित्य भेट देण्यात येईल असे सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, वर्गशिक्षिका वैशाली चिमुरकर यांनी सुद्धा या विद्यार्थ्याला त्याने काढलेल्या चित्रांकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.
0 comments:
Post a Comment