चंद्रपूर :
इंडियन रोप स्कीप्पिंग फेडरेशन (IRSF), नवी दिल्ली व रोप स्कीप्पिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग (जि. रायगड) येथे आयोजित IRSF मान्यताप्राप्त राष्ट्रीय रोप स्कीप्पिंग चॅम्पियनशिपमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील आयुषी स्पोर्ट्स अकादमी व चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अमेचुअर रोप स्कीप्पिंग असोसिएशन®*च्या खेळाडूंनी ऐतिहासिक यश संपादन केले आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेत देशातील १९ राज्यांतील सुमारे ७५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १२ खेळाडूंनी एकूण १ सुवर्ण, ९ रौप्य व ६ कांस्य पदकांची कमाई करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला.Ayushi Sports Academy's historic success in the National Rope Skipping Championship
सर्व विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव तथा IRSF चे पेट्रोन आदरणीय श्री. संजय शेटे सर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे –
दीक्षांत रामटेके – १ रौप्य, १ कांस्य
दीक्षांत सोनारकर – १ कांस्य
नैतिक झांबडे – १ रौप्य
आर्यवीर राठोड – १ रौप्य
अमीन खान – १ रौप्य
ईशान शेख – १ रौप्य
संस्कार ठाकुरवार – १ रौप्य, १ कांस्य
कु. खुशी वाघमारे – १ सुवर्ण
नयन वाडगुळे – १ रौप्य
रुद्रा हिंगणे – १ रौप्य
कु. कुमुद नैताम – १ रौप्य
जीत चिन्ने – १ रौप्य, १ कांस्य
या यशस्वी खेळाडूंना रोप स्कीप्पिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र®चे अध्यक्ष श्री. सुभाषचंद्र नायर, तांत्रिक सचिव श्री. मिलिंद पांचाल तसेच राष्ट्रीय जज श्री. दुर्गराज एन. रामटेके यांचे मोलाचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले.
राष्ट्रीय स्तरावर प्रथमच मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अमेचुअर रोप स्कीप्पिंग असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. शीतल रामटेके, सचिव श्री. करण डोंगरे, सहसचिव श्री. बी. एल. करमनकर, आयुषी स्पोर्ट्स अकादमीचे संजय माटे, सुरज मेश्राम, तांत्रिक अधिकारी अशोक कामडे तसेच प्रशिक्षक गणेश राठोड, राकेश राय, संदीप पंधरे, पांडुरंग भोयर यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी व क्रीडाप्रेमींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
0 comments:
Post a Comment