राजुरा २६ डिसेंबर :-
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजुरा कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत विद्यार्थ्यांमध्ये धैर्य ,त्याग, राष्ट्रभक्ती , संवेदनशीलता या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी "वीर बालक दिवस" veer balak diwas साजरा करण्यात आला. शौर्याची परंपरा साहिबजाद्यांचा यांचा अमर वारसा म्हणून आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथील इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी तुलसी सुरेंद्र आत्राम हिचा राज्यस्तरीय उपक्रमात कर्तृत्व म्हणून धनुर्विद्या खेळात प्रतिनिधित्व करण्यासाठी तसेच संकटाच्या वेळी धाडसी कृती करून जीव वाचविणारे मुले म्हणून चिरायू महादेव सोयाम इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, तसेच कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता महाराष्ट्र, मंत्री ॲड.मंगलप्रभात लोढा यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन वीर बालक म्हणून सन्मानित करण्यात आले.
"Veer Balak Diwas" celebrated with enthusiasm at Government Industrial Training Institute Rajura. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुभाष तुरके, प्र. प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजुरा यांची तर प्रमुख अतिथी म्हणून रमेश रोडे, गटनिदेशक, सुरेंद्र आत्राम यांची व सत्कारमूर्ती म्हणून तुलसी आत्राम, चिरायू सोयाम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चार साहिबजाद्यांच्या प्रतिमेचे पूजन व त्यांच्या शौर्य व त्यागाचा परिचय करून देण्यात आला. यावेळी पोस्टर व चित्रकला स्पर्धेतील क्रमांकप्राप्त प्रज्वल वानखेडे, गुरुदास जांभूले, शिवम पुल्लावार, साहिल नन्नावरे, आशिष बोरकर यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शेंडे व श्रीगणेश गेडाम यांनी केले. प्रास्ताविक सुभाष तुरके,प्र. प्राचार्य यांनी केले. आभारप्रदर्शन रमेश रोडे यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रीय मूल्ये व शौर्य शपथ तसेच राष्ट्रगीताने करण्यात आला.
---------------------------------------------
वीर बाल सत्कार
*राज्यस्तरीय क्रीडा कौशल्य उपक्रमात कर्तृत्व*
कु. तुलसी सुरेंद्र आत्राम इयत्ता सहावीत आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा या शाळेत शिक्षण घेत असून तिने नऊ व तेरा वर्षा खालील वयोगटात मिनी सब ज्युनिअर महाराष्ट्र स्टेट आर्चरी चॅम्पियनशिप, बसमत जिल्हा हिंगोली येथे राज्य स्तरावर Archery (धनुर्विद्या) खेळात प्रतिनिधित्व केले आहे. त्याबद्दल तिचा वीर बालक म्हणून सन्मान करण्यात आला.
---------------------------------------------
संकटाच्या वेळी धाडसी कृती करून जीव वाचविणारे मुले
चिरायू महादेव सोयाम इयत्ता सातवीत आदर्श शाळेत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने वर्ग खोलीत नाग प्रजाती चा अत्यंत विषारी साप होता. तो बेंच खाली लपून बसला होता. तो साप या मुलाला दिसताच यांनी संपूर्ण वर्गातील मुलाना वर्गाच्या बाहेर काढले आणि स्वतः सोबतच वर्गातील इतरही विद्यार्थ्यांचे प्राण वाचविले. त्यांनी समयसूचकता दाखवून सर्प - मानव संघर्ष टाळला व सर्प मित्रांना बोलावून त्या सापाला निसर्गमुक्त केले त्याबद्दल त्याचा वीर बालक म्हणून सन्मान करण्यात आला.
---------------------------------------------
या विद्यार्थ्यांना वीर बालक पुरस्कार मिळाल्याबद्दल बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा संस्थेचे अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबणानी, सचिव भास्कर येसेकर, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकीवार, संचालक मंडळ तसेच आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, वर्गशिक्षक रूपेश चिडे, ॲड. रजनी पिदुरकर तसेच शिक्षक, पालक व शाळेतील विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
0 comments:
Post a Comment