घुग्घुस :-घुग्घूस शहरातून सर्रास पने जड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात घडत आहे व प्रदूषण वाढत आहे आम आदमी पार्टी द्वारा वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन सुस्त बसलेली आहे. घुग्घूस शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. शहरातील प्रदूषण अत्यंत जोमाने वाढत आहे. ज्यामुळे शहरातील नागरिकांना वेगवेगळ्या जीवघेण्या आजारांशी सामना करावा लागत आहे. लहान मुलांना दमा, शुगर, लखवा, सारखा आजार होत आहे. शहरामध्ये दररोज मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम लागलेला असतो. ज्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज अपघात होत आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या अपघात होत आहे. प्रत्यक्षात पाहता जड़ वाहतूक WCL च्या मार्गाचा पर्याय उपलब्ध आहे पन WCL चे अधिकारी व ट्रांसपोर्ट कंपनी ची मिलीभगत असल्यामुळे हा ग़ैरप्रकार चालू आहे प्रदूषण करणारे ट्रक वर शाहरातून सरार्सपने नियम मोडून ट्रक ला ताळपत्री न टाकता ओवरलोड वाहतूक करण्यात येते पण RTO विभाग सुध्दा डोळे बन्द करुण कुंभकर्णी झोपेत गेले ही सर्व बाब लक्षात घेता आम आदमी पार्टी द्वारा ३०/१०/२०२१ रोजी साखळी उपोषण करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर, प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर, तहसिलदार, पोलिस स्टेशन घुग्घुस यांना निवेदन देण्यात आले.परंतु याची कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही म्हणून आज पासून आम आदमी पक्षा तर्फे छत्रपति चौकात साकळी उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे या मधे घुघुस चे शहर अध्यक्ष अमित बोरकर यांनी उपोषणाला सुरुवात केली असून बहुजन समाज पार्टी ने पण या आन्दोलनाल आपले समर्थन जाहिर करत BSP चे अध्यक्ष मोहन येमुर्ले उपोषणाला बसले आहे
यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे , जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी,युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, अभिषेक सपडी ,सागर बिऱ्हाडे, आशिष पाझारे, विकास खाडे, प्रशांत सेनानी, थिरुमालेश,निखिल बारसागडे,संदीप पथाडे,रवी शंतलावार,अभिषेक तालपेल्ली,भद्रावती तालुका अध्यक्ष सोनल पाटिल,भद्रावती ता. सचिव सुमित हस्तक, रजत जुमडे,सोनू शेट्टियार, करण बिऱ्हाडे,धनराज भोंगळे, दिनेश पिंपळकर, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.Heavy traffic should be stopped from the city and for Aam Aadmi Party's chain fast from 30/10/2021 for pollution free Ghughus.
0 comments:
Post a Comment