भद्रावती : जावेद शेख
मांगली येथील जिल्हा परिषद शाळेजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भद्रावती पोलिसांनी गुरुवारी (१० सप्टेंबर) धाड टाकून ‘तीन पत्ती’ जुगार खेळणाऱ्या सात जणांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, पत्ते आणि तीन दुचाकी असा एकूण १ लाख ५८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्रभारी अधिकारी परी पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस हवालदार प्रशांत शेंदरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार तसेच देवानंद डुकरे, गोपाल आतकूलवार, खुशाल कावळे, नितीन आमटे व इतर पोलीस कर्मचारी मांगली परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पंचांसमक्ष जिल्हा परिषद शाळेजवळ छापा टाकण्यात आला.
यावेळी सुरज राजू लवाडिया (३४, रा. बरांज तांडा), अंकुश जंगलू मडावी (३२, रा. मांगली), किशोर भगू भुक्या (३४, रा. बरांज तांडा), सुरज रामदेव कोटनाके (३५, रा. मांगली), वैभव मोहन बोडेकर (२७, रा. मांगली), कल्याण शंकर पठाडे (५५, रा. मांगली) आणि अजित शंकर शेट्टी (२७, रा. किल्ला वॉर्ड, भद्रावती) यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी आरोपींच्या अंगझडतीसह जुगाराच्या डावाच्या ठिकाणाहून ८ हजार २०० रुपये रोख रक्कम व पत्ते जप्त केले. तसेच जुगारासाठी वापरल्या जात असल्याचा संशय असलेल्या हिरो एचएफ डिलक्स (एमएच ३४ सीएल ६४६२), हिरो स्प्लेंडर (एमएच ३४ ए.क्यू. ९६१२) आणि हिरो प्लेझर (एमएच ३४ सीजी २५३४) या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ५८ हजार २०० रुपये आहे.
या प्रकरणी सातही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, भद्रावती पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
0 comments:
Post a Comment