Ads

मला माझी शेती वाहू द्या .Let me cultivate my farm

भद्रावती (तालुका प्रतिनिधि):-
मला माझी शेती वाहू द्या अशी मागणी ८२ वर्षीय वृद्ध शेतकरी महादेव वरारकर यांनी पत्रपरिषदेत केली.
पत्रपरिषदेत महादेव वरारकर यांनी सांगितले की, मी आणि माझे भाऊ वासुदेव वरारकर यांच्या नावाने मौजा घोनाड येथे साजा क्र. २९ मध्ये १८ एकर जमीन आहे. २०१० मध्ये वासुदेव वरारकर यांचे निधन झाले. त्यानंतर शेतीच्या आवश्यक दस्तऐवजावर वारसानांची नावे चढविण्यात आली. त्यात गडबड झाल्याने आपसी समझोता करून प्रकरण मिटविले.
दरम्यान,पुतण्या भास्कर वरारकर याने कोणत्याही प्रकारचा फेरफार न घेता सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक खोब्रागडे यांना विकली असाही आरोप महादेव वरारकर यांनी पत्रपरिषदेत केला. १८ एकर जमीनीपैकी ६.३१ आर. जमिन माझ्या हिश्याची असून माझा पुतण्या मला वाहू देत नाही.मी खोब्रागडे यांची जमीन ठेक्याने करतो असे म्हणतो. मारायला धावतो.२०१६ मध्ये त्याने मारहाण केली होती व उलट माझ्यावरच केस लावली.असाही आरोप महादेव वरारकर यांनी यावेळी केला. तसेच सदर शेतीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने निकाल लागेपर्यंत कोणीही अडथळा आणू नये व मला शेती करु द्यावे असेही वरारकर पत्रपरिषदेत म्हणाले. दि.२८ ऑक्टोबर रोजी नायब तहसीलदार भांदककर व तलाठी गहुकर आणि दोन पोलिस शेतात आले व परत निघून गेले. त्यांनी काहीच केले नाही.असेही वरारकर यांनी पत्रपरिषदेत सांगितले.दरम्यान, याबाबत भास्कर वरारकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.Let me cultivate my farm 82 years old farmer appeals to Administration
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment