ग्रामसभेमध्ये उर्मटपणे वागणाऱ्या ग्रामसभेचा अपमान करणाऱ्या तलाठी जे.टी
बल्की यांना निलंबित करा अशी मागणी वढोलीतील नागरिकांनी दि.२९ शुक्रवारी तहसीलदार यांच्याकडे निवेदनातुन केली.
सभेच्या विषयाप्रमाणे विभागणिहाय उपस्थित कर्मचाऱ्यांकडून आपआपल्या विभागातील माहिती व योजनेविषयी चर्चा करण्यात आली.तलाठी बल्की यांनी तलाठी विभागाबद्दल चर्चा करण्यात आली.त्यावेळी उपस्थित नागरिकांनी अनेक कामे प्रलंबित असुन काम करण्यासाठी तलाठी यांना पैसे दिल्याची माहिती ग्रामसभेत दिली.त्यावेळी तलाठी यांनी मी तुमच्या बापाचा नौकर नाही वाटणार तेव्हा काम करणार असे वादग्रस्त विधान केले.वृद्धपकाळ योजनेच्या फॉर्म वर सही मारण्यासाठी पाचशे रुपये घेतात असा आरोप देखील निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली.यावेळी सरपंच राजेश कवठे,तंटामुक्त समिती अध्यक्ष शामराव सोनटक्के,ग्रा.पं सदस्य सुरेंद्र मडपल्लीवार,मुरली आत्राम,संदिप लाटकर,अनिल खरबनकर,सुधीर पोतरजवार,राहुल सोनटक्के यांची उपस्थिती होती.
तक्रार प्राप्त झाली आहे.चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल.
-तहसीलदार के डी मेश्राम
0 comments:
Post a Comment