Ads

21 वर्षांपासून फरार असलेल्या हत्या प्रकरणात असलेला आरोपीला चंद्रपूर शहर पोलिसांनी केली अटक.

The chandrapur Times चंद्रपूर :- वर्ष 2002 ला सख्ख्या मोठ्या भावावर देशी कट्ट्याने फायर करीत लहान भावाने संपवून टाकले होते, गुन्हा घडल्यानंतर आरोपी हा फरार झाला होता, चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीचा वापर करीत, 21 वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या आरोपीला शहर पोलिसांना अटक केली

चंद्रपुर पोलीस स्टेशन मधील अपराध कं ११८ / २००२ कलम ३०२ सह कलम ३,२५ भादवि मधील पाहीजे फरार आरोपी नामे संजय तुमचंद रॉय य ४२ वर्ष रा महाकाली वार्ड चंद्रपुर ह.मु दुन्डा शिवनी राज्य मध्य प्रदेश याचे विरूध्द फिर्यादी नामे दिलपकुमार दालचंद रॉय वय २५ वर्ष रा महाकाली कॉलरी प्रकाश नगर चंद्रपुर याने तोडी रिपोर्ट दिली की, सदर आरोपीत ईसम नामे रमेश कुमार उर्फ मस्तराम तुमचंद रॉय वय ३६ रा प्रकाश नगर महाकाली कॉलरी चंद्रपुर याने आपले सख्या मोठया भावाला रागाचे भरात देशी कट्टयाने फायर करून ठार मारले वरून सदरचा गुन्हा नोंद करून सन २००२ मध्ये तपासात घेतला. सदरच्या प्रकरणात पोलीस उप निरीक्षक निलेश वाघमारे व सोबत पोहवा / १९०४ विलास निकोडे, पोशि / २३९२ प्रमोद डोंगरे या पाहिजे फरार आरोपी पथकाने आरोपीचे नातेवाईकाशी संपर्क साधुन गोपनीय खबर मिळवली व तांत्रीक मदत घेवुन आरोपी हा डुन्डा शिवनी राज्य मध्यप्रदेश येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने पोलीस अधिक्षक साहेब यांचे परवाणगी घेवुन राज्य मध्यप्रदेश येथे आरोपी शोध कामी रवाणा झाले असता अथक व सतत ३ दिवस प्रयत्न करून तब्बल २१ वर्षापासुन फरार असलेला आरोपी नामे संजय तुमचंद रॉय वय ४२ वर्ष रा महाकाली कॉलरी हं.मु डुन्डा शिवनी राज्य मध्यप्रदेश येथुन यास ताब्यात घेतलेले असुन त्यास कायदेशीर कार्यवाही करणे कामी पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे आणले आहे. सदरची कार्यवाही हि मा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, मा अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांचे नेतृत्व पोलीस उप निरीक्षक निलेश वाघमारे, पोउपनि कोरडे तसेच पोहवा विलास निकोडे, पोअ प्रमोद डोंगरे, इमरान खान पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर यांनी केलेली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment