चंद्रपूर :
चंद्रपूर महानगरपालिका एमईएल प्रभाग क्रमांक ३ मधून अनुसूचित जमाती गट ‘ब’ साठी धनराज पूनम कोवे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात दमदार एन्ट्री घेतली आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे वचननामे आणि प्रत्यक्ष संपर्काधारित प्रचारामुळे ते सध्या प्रचारात आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे.Independents surge in MEL Ward 3; Dhanraj Kove's campaign receives overwhelming support from the public
धनराज पूनम कोवे यांनी आपल्या वचननाम्यात प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश केला आहे. प्रभागातील गरीब व गरजू नागरिकांना घरकुल मंजूर करून देणे, अत्याधुनिक लायब्ररीची उभारणी, शुद्ध व नियमित पाणीपुरवठा, तसेच अंडरग्राऊंड ड्रेनेज व्यवस्था करण्याचा त्यांनी ठाम संकल्प व्यक्त केला आहे. यासोबतच बंद पडलेल्या शाळा सेमी इंग्लिश मिडियम पॅटर्नवर सुरू करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
प्रभाग खड्डेमुक्त करणे, स्मशानभूमीचे आधुनिकीकरण, छत्तीसगडी बांधवांना रेशन कार्ड उपलब्ध करून देणे, पीएससी २४ तास सुरू ठेवणे, मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, बेरोजगार युवक-युवतींसाठी कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, बालोद्यान व संस्कार केंद्र उभारणे, नियमित आरोग्य शिबिरे तसेच महिला जागृती व सबलीकरणासाठी मार्गदर्शन शिबिरे घेण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
तसेच प्रभागातील महावितरणच्या विद्युत पुरवठ्याच्या वायरिंग अंडरग्राऊंड करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, घरोघरी भेटी, थेट संवाद आणि विकासकेंद्रित भूमिका यामुळे धनराज पूनम कोवे यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत असून विजयी होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. स्वच्छ, पारदर्शक व विकासाभिमुख कारभारासाठी “गुडगुडी” या बोधचिन्हावर मतदान करून आपल्याला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी प्रभागातील मतदारांना केले आहे.
0 comments:
Post a Comment