भद्रावती प्रतिनिधी जावेद शेख :-
सिकलसेल अॅनिमियाच्या प्रतिबंध व जनजागृतीसाठी भद्रावती तालुक्यात दिनांक १५ जानेवारी २०२६ ते ०७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आरोग्य विभागातर्फे १६३ आरोग्य पथके (टीम) तयार करण्यात आली असून, या पथकांद्वारे घरोघरी भेट देऊन सिकलसेल रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे.Sickle cell anemia special campaign begins in Bhadravati taluka
या अभियानात सिकलसेलग्रस्त AS व SS रुग्णांना विवाहपूर्व तसेच विवाहानंतर घ्यावयाच्या आवश्यक काळजीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सिकलसेल आजाराचे दुष्परिणाम, त्यावरील उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच योग्य आरोग्य सल्ला देण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
या संदर्भात नगराध्यक्ष मा. प्रफुलभाऊ चटकी यांची तालुका आरोग्य अधिकारी, भद्रावती यांनी दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी भेट घेऊन अभियानाबाबत माहिती दिली व सहकार्याची विनंती केली.
सिकलसेल रक्त तपासणी करु इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी खालील ठिकाणी मोफत सुविधा उपलब्ध राहणार आहे —
ग्रामीण रुग्णालय, भद्रावती
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, भवानी माता मंदिराजवळ
आपला दवाखाना, गवराळा
तालुक्यातील नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, सिकलसेल तपासणी करून आरोग्यदृष्ट्या सुरक्षित जीवनाकडे पाऊल टाकावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी,भद्रावती, आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment