राजुरा २५ फेब्रुवारी :-
सिमेंट उद्योगाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दालमिया सिमेंट प्लांट, नारंडा येथे सर्वोत्कृष्ट कंत्राटदार हा मानाचा पुरस्कार पंडित काळे यांना प्रदान करण्यात आला. हा सन्मान अत्यंत अभिमानाचा आणि आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरणारा आहे असे परिपादन पंडित काळे यांनी केले.
या प्रसंगी युनिट हेड प्रणब नाईक , एच.आर. हेड अरविंद बौरा तसेच सिमेंट प्लांटचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि मेडल देऊन गौरव करण्यात आला. यापूर्वीही पंडित काळे यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले असून ते नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग सचिव म्हणून पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचेही सामाजिक कार्य करीत आहेत.
--------------------------------------------
*पंडित काळे, युवा उद्योजक* हा पुरस्कार स्वीकारताना मनात कृतज्ञतेची भावना दाटून आली. हा पुरस्कार केवळ माझ्या एकट्याचा नसून, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सहकाऱ्यांचा, कामगार, मार्गदर्शन करणाऱ्या वरिष्ठांचा आणि सदैव पाठिंबा देणाऱ्या कुटुंबियांचा आहे. कठोर परिश्रम, सातत्य, प्रामाणिकपणा यांच्यामुळेच हा यशाचा टप्पा गाठता आला. हा सन्मान माझ्या जबाबदाऱ्या अधिक वाढवणारा आहे. भविष्यातही उद्योग क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करण्याचा आणि संस्थेच्या प्रगतीत अधिक योगदान देण्याचा माझा निश्चय आहे.
“यश ही अंतिम मंजिल नसून, ती नव्या प्रवासाची सुरुवात असते.” अशी प्रतिक्रिया यावेळी पंडित काळे यांनी दिली.
--------------------------------------------
0 comments:
Post a Comment