जावेद शेख / प्रतिनिधी भद्रावती:
आज दिनांक 26-02-2026 रोजी मा गट विकास अधिकारी श्री आशुतोष सपकाळ यांचे सूचनेनुसार व मा सहा. गट विकास अधिकारी श्री बंडूजी आकनूरवार यांचे मार्गदर्शनात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कीटकनाशक फवारणी कार्यशाळा ग्रामपंचायत चोरा येथे कार्यशाळा घेण्यात आली.Pesticides and workshops organized at Chora under the Chief Minister's Samrudd Panchayat Raj Abhiyan
सदर कार्यशालेला अध्यक्ष म्हणून तालुका कृषि अधिकारी श्री सुशील आडे, प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत चोरा येथील माजी सरपंचा श्रीमती खिराटकर, प्रमुख मार्गदर्शक मंडळ कृषि अधिकारी श्री विजय कवाडे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात कीटकनाशक फवारणी करताना घ्यावायची काळजी, कीटकनाशक फवारणी योग्य वेळ, मित्र किडी व शत्रू किडीची विस्तृत माहिती व नैसर्गिक उपाययोजना बद्दल आणि महाविस्तर AI अँप चे विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मार्गदर्शन श्री सुशील आडे तालुका कृषि अधिकारी भद्रावती तर प्रमुख मार्गदर्शन श्री विजय कवाडे मंडळ कृषि अधिकारी, प्रस्ताविक महेंद्र डाखरे कृषि अधिकारी व कार्यक्रमाचे संचालन गुरनुले ग्रामपंचायत अधिकारी गुरनुले, व आभार प्रदर्शन प्रमोद ढोरे विस्तार अधिकारी कृषि यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी विस्तार अधिकारी प्रमोद ढोरे व सुहास पाटेवार व चोरा ग्रामपंचायत येथील शेतकरी वर्गाचे सहकार्य लाभले.
0 comments:
Post a Comment