विरूर स्टे / प्रतिनिधी :
राजुरा तालुक्यातील विरूर स्टे परिसरात अवैध रेती साठ्यावर महसूल विभागाने एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करत एकूण दहा ब्रास रेती जप्त केली. सदर कारवाई तहसीलदार ओमप्रकाश गौड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Raid on sand deposits at two places in Virur Stay on the same day
काल दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी विरूर स्टे परिसरातील लेआऊट भागात असलेल्या जागेवर साठवलेली सहा ब्रास रेती जप्त करण्यात आली. सदर रेती ही पावडे यांची असून घरकामासाठी आणल्याचे सांगण्यात आले. मात्र गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीची खात्री करून तलाठी शिल्पा यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून कारवाई केली.
यानंतर या बाबतची माहिती मंडळ अधिकारी सुभाष साळवे यांना देण्यात आली. त्यानुसार साळवे यांनी पुढील तपासाचे निर्देश देत खांबाळा गावाजवळील विटा भट्टी परिसरात छापा टाकला. तेथे विटा भट्टी मालक देविदास खोबरे यांच्या जवळील चार ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला. या दोन्ही प्रकरणांमध्ये नियमांनुसार पुढील कारवाई करण्यात आली आहे.
या धडक कारवाईमुळे परिसरातील रेती तस्करांचे धाबे दणाणले असून, अवैध रेती व्यवसायावर आळा बसण्यास मदत होणार आहे. सदर कारवाईत तलाठी व मंडळ अधिकारी यांनी बजावलेली भूमिका कौतुकास्पद असून, त्याचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार ओमप्रकाश गौड यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
0 comments:
Post a Comment