Ads

राजुरा पोलिसांचा मोठा धडाका! लाखोंचा अवैध डिझेल साठा जप्त, बोलेरो कॅम्परसह ९.९१ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

राजुरा | प्रतिनिधी:-
पोलीस स्टेशन राजुरा हद्दीत अवैधरित्या साठवून ठेवलेल्या डिझेलविरुद्ध राजुरा पोलिसांनी मोठी कारवाई करत ९,९१,८०० रुपये किमतीचा डिझेल साठा व बोलेरो कॅम्पर वाहन जप्त केले आहे. ही कारवाई दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली.crime newsRajura police make a big splash! Illegal diesel stock worth lakhs seized, valuables worth Rs 9.91 lakh including Bolero camper seized
मिळालेल्या माहितीनुसार, कॅम्प नं. १७, सास्ती येथे बोलेरो कॅम्पर क्र. एम.एच.३४–बीझेड–८६६५ चा फरार चालक व त्याचे २ ते ३ साथीदार कोणतीही परवानगी न घेता १०२० लिटर डिझेल अत्यंत निष्काळजीपणे, पुरेसा बंदोबस्त न करता साठवून ठेवत असल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती.
घटनास्थळी पंचनामा करून अंदाजे ९,९१,८००/- रुपये किमतीचा डिझेल साठा, साठवणुकीसाठी वापरलेली बोलेरो कॅम्पर, तसेच प्लास्टिक ड्रम व कॅन जप्त करण्यात आले.
या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात अप.क्र. १८/२०२६ अन्वये कलम २८७, ३(५) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा श्री सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सुमित परतेकी यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आली. गुन्हे शोध पथक इन्चार्ज पोउपनि श्री दीपक ठाकरे, पोउपनि श्री पराग उल्लेवार, सफौ किशोर तुमराम, पोहवा पुंडलिक परचाके, विक्की निर्वाण, महेश बोलगोडवार, मिलिंद जांभळे व शफीक शेख यांनी ही यशस्वी कारवाई केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment