विरूर / वरूर प्रतिनिधी :
राजुरा तालुक्यातील विरूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वरूर गाव परिसरात अवैध रेती वाहतुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. एकाच ट्रान्झिट पास (टी.पी.)Transit Pass वर दोन रेती भरलेले ट्रॅक्टर वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले असून, यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
वरूर ते विरूर पोलिस स्टेशन हे अंतर अवघे १० किलोमीटर असताना, सदर टी.पी.वर तब्बल ४ तासांची टाइमिंग देण्यात आली आहे. प्रत्यक्षात हा रस्ता एका तासात पूर्ण होऊ शकतो. या अतिरिक्त वेळेचा फायदा घेत रेती तस्कर अवैधरित्या वाहतूक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.Two sand tractors transported on the same TP; Doubts on the role of Virur police
विशेष म्हणजे, संबंधित ट्रॅक्टर चालकांकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही, बॅच नंबर नाही, तसेच दारूच्या नशेत वाहन चालवले जात असल्याचेही समोर आले आहे. विरूर पोलिसांनी ट्रॅक्टर पकडून चलान फाडले, मात्र त्यानंतर गाडी सोडण्यात कशी आली? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
सदर प्रकार घडत असताना मंडळ अधिकारी सुभाष साळवे हे घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार यांना फोनद्वारे विचारणा केली असता, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की एका टी.पी.वर फक्त एकच गाडी चालू शकते. तरीसुद्धा पोलिस स्टेशनमध्ये लावलेली गाडी सोडण्यात कशी आली, याबाबत मोठा संशय व्यक्त केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासन व रेती तस्कर यांच्यात हातमिळवणी आहे का? अशी चर्चा गावागावात सुरू झाली आहे. टी.पी. देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तसेच अवैध रेती वाहतुकीत सहभागी असणाऱ्यांवर तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0 comments:
Post a Comment