चंद्रपुर :-निसर्गाने जात-पात,धर्म,रंग व लिंग याच्या आधारावर भेदभाव केलेला नाही.त्यामुळे आम्हालाही तसा भेदभाव करण्याचा अधिकार नाही. समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान करण्याची आमची भूमिका आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सेवा देण्याचा जन विकास सेनेचा संकल्प आहे. नागपूर रोडवरील नानाजी नगर नगर येथे टीव्हीएस अंजिकर शोरूम समोरील येरगुडे काॅम्प्लेक्स मध्ये जनविकास सेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी बोलताना देशमुख यांनी जन विकास सेनेची भूमिका व विचार मांडले.यावेळी मंचावर मुक्ती मल्टीपर्पज सोसायटी च्या अध्यक्षा अनुपमा नगरकर-बुजाडे, जनविकास सेनेचे उपाध्यक्ष घनश्याम येरगुडे उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रम मध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
तृतीयपंथी व्यक्तीला दिला उद्घाटनाचा बहुमान
साजन राजू बहुरिया या तृतीयपंथी व्यक्तीच्या हस्ते जन विकास सेनेच्या संपर्क कार्यालयाचे तसेच फलकाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी साजन बहुरिया व बिंदू मावशी या तृतीयपंथी व्यक्तींचा तसेच चंद्रपूर शहरातील तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या मुक्ती मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्षा अनुपमा नगरकर-बुजाडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जनविकास सेनेचे अध्यक्ष देशमुख यांनी कार्यालयातील स्वतःच्या खुर्चीवर साजन बहुरिया यांना बसवून त्यांचा सन्मान केला. संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर नागपूर रोडवरील फलकाचे अनावरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनविकास कामगार संघाचे राहुल दडमल, प्रास्ताविक युवा आघाडीचे अक्षय येरगुडे तसेच आभार प्रदर्शन महिला आघाडीच्या मनीषा बोबडे यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्विते करिता जन विकास सेनेचे आकाश लोडे,गितेश शेंडे,गोलू दखणे, प्रफुल बैरम, नामदेव पिपरे,इमदाद शेख,देवराव हटवार,निलेश पाझारे,अनिल दहागावकर,नंदू सोनारकर,संजय वासनिक, किशोर महाजन, मिना कोंतमवार कांचन चिंचेकर, कविता अवथनकर,बबिता लोडेल्लीवार, भाग्यश्री मुधोळकर, गीता मून, निलिमा वनकर, ज्योती कांबळे,सुभाष फुलझेले, हरिदास देवगडे, सुभाष पाचभाई, सुरेश साळवे, दिनेश कंपू, , धर्मेंद्र शेंडे, चंदू झाडे, तुषार निखाडे, सतिश येसांबरे, अमोल घोडमारे, प्रफुल बजाईत, गोलू पेंदाम, , माया बोढे, अरुणा महातळे, निर्मला नगराळे, मेघा मगरे, , संगीता चंदेलकर, पायल मगरे यांनी अथक परिश्रम घेतले.
0 comments:
Post a Comment