घुग्घूस : नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदाकरिता उदया दिनांक 07 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता निवडणूक होत असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गटनेते राजीरेड्डी यांनी उद्या होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान करावा असा पक्ष आदेश 'व्हिप जारी केला असून काँग्रेस पक्षाच्या गटात 14 लोकांचा समावेश आहेत.
दोन अपक्ष उमेदवार देखील काँग्रेस पक्षात शामिल झाले असून सदर व्हिप त्यांच्यावर ही लागू होत आहे.
रेड्डी यांनी पक्षाच्या नगरसेवकांना विनम्र आवाहन केले आहे की घुग्घूस शहरातील जनतेने मोठ्या विश्वासाने काँग्रेसला बहुमत दिलेले आहे.
जनतेच्या विश्वासाचा घात करू नये सर्वांनी पक्षाच्या आदेशानुसार मतदान करावे पक्षाच्या आदेशा विरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकावर ना ईलाजाने कायदेशीर कारवाई करण्यात येईल व त्यांचा नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता असल्यामुळे कुणी ही आत्मघातकी पाऊल उचलू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment