Ads

अपक्ष उमेदवार नीलू खान यांचा भाजपा उमेदवारांना जाहीर पाठिंबा

चंद्रपूर | दि. 2 जानेवारी 2026:-
चंद्रपूर महानगरपालिकेच्या जल नगर, जटपुरा प्रभाग क्रमांक 7 मधील अपक्ष उमेदवार नीलूभैय्या खान यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपा प्रणित उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. माननीय छबुताई वैरागडे, प्रमोद क्षीरसागर, रवि लोणकर आणि भाग्यश्री हांडे यांना त्यांनी आपले समर्थन जाहीर केले.Independent candidate Neelu Khan publicly supports BJP candidates
नीलू खान यांच्या निवासस्थानी आयोजित सभेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा, विकासकामांना अधिक गती मिळावी तसेच माननीय छबुताई वैरागडे यांच्या कार्यकाळात ज्या पद्धतीने प्रभागातील इतर भागांचा विकास झाला, त्याच धर्तीवर जल नगर परिसरातही विकासाची कामे व्हावीत, या उद्देशाने हा पाठिंबा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनीही एकमताने भाजपा उमेदवारांना समर्थन दर्शविले.
या सभेला राजेश नागपुरे, सुनीता नागपुरे, शकुंतला कार्लेकर, आबिद खान, नीलू खान, जावेद खान, शिवा भैय्या, इमरान शेख, पठाण शालुबाई, अनुसया कार्लेकर, शरद कांबळे, नंदकिशोर बल्लावार, अतुल मांढरे, गणेश कांबळे, इमरान भाई, मकसूद भाई, इकबाल भाई, इरफान भाई आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment