चंद्रपूर, दि. 03 जानेवारी 2026 :
चंद्रपूर शहर परिसरात घडलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील पथकाने सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांचे फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे एका आरोपीस ताब्यात घेऊन यशस्वी कारवाई केली आहे
या कारवाईत आरोपीकडून 40,000 रुपये किंमतीची होंडा शाईन मोटरसायकल (क्रमांक MH34 CS 5641) जप्त करण्यात आली आहे.
सदर गुन्हा पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर अप. क्र. 917/2025, कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अंतर्गत नोंदविण्यात आला होता.
आरोपीचे नाव :
प्रतीक उर्फ राहुल धनराज झाडे, वय 35 वर्षे,रा. महाकाली कॉलरी, चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर.
ही कारवाई उपविभाग चंद्रपूर पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली असून पुढील तपास संबंधित पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगिरीमुळे वाहन चोरी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
0 comments:
Post a Comment