Ads

“चिमूर हादरलं! अवघ्या ३ तासांत खुनाचा उलगडा; तिघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात”

चिमूर | प्रतिनिधी:-
चिमूर शहरात घडलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यात चिमूर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत अनोळखी आरोपींचा शोध घेऊन तिघांना अटक करत गुन्हा उघडकीस आणला आहे. crime News
Chimur shocked! Murder solved in just 3 hours; Three accused in police Custody”
दि. ०४/०१/२०२६ रोजी पोलीस स्टेशन चिमूर येथे फिर्यादी सौ. उषा प्रभाकर उताने (वय ५०, रा. तनिस कॉलनी, ठक्कर वॉर्ड, चिमूर) यांनी तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीनुसार नेहरू शाळा, चिमूर परिसरात त्यांचा मुलगा आकाश प्रभाकर उताने (वय ३१) हा डोक्यावर मारहाण झाल्याने जखमी अवस्थेत पडलेला आढळून आला. त्यानंतर उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलीस स्टेशन चिमूर येथे अप.क्र. ०२/२०२६ कलम १०३(१) BNS अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, प्रथमदर्शनी दारूच्या नशेत झालेल्या वादातून मृतकाने आरोपींना शिवीगाळ केल्याने झटापट झाली व त्यातून खून झाल्याचे निदर्शनास आले.
या गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे व मा. पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आला. पोलीस स्टेशन स्तरावर विशेष पथक तयार करून शोध मोहीम राबविण्यात आली.
पोलिस पथकाने अवघ्या तीन तासांत गुन्ह्यातील आरोपी१) सुजल विलास सोनवाने (वय २०),२) छगण मोहन दिगोरे (वय २७),३) अनिकेत शेषराव साखरकर (वय २४),तिन्ही रा. नेताजी वॉर्ड, चिमूर
यांना अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment