चंद्रपूर :- देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच देशाची सर्व आघाड्यांवर प्रगती व्हावी म्हणून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच त्यांना आयर्न लेडी म्हणून ओळखले जाते. देशाच्या विकासात इंदिरा गांधी यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी केले.
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (ता. ३१) सकाळी ९.३० वाजता माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार बोलत होते.
शहरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक परिसरातील इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष चित्राताई डांगे, शहर जिल्हाध्यक्ष सुनीताताई अग्रवाल, मनपाचे गटनेता डॉ. सुरेश महाकुलकर, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संदीप गड्डमवार, कामगार नेते के. के. सिंग, उमाकांत धांडे, राजेश अडूर, कुणाल चहारे, भालचंद्र दानव, नरेंद्र बोबडे, प्रसन्ना शिरवार, पप्पू सिद्दीकी, मोनू रामटेके, प्रवीण माहूरकर, रवी रेड्डी, स्वाती त्रिवेदी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Home
chandrapur
देशाच्या विकासात इंदिराजींचा मोठा वाटा *पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांचे प्रतिपादन .
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment