भद्रावती प्रतिनिधी /जावेद शेख:- दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी भद्रावती पोलिसांना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की मौजा गोरजा येथील झुडपी जंगल परिसरात काही इसम कोंबडा बाजार भरवून त्यावर पैशांची बाजी लावून हार-जीतचा जुगार खेळत आहेत. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पंच व पोलीस स्टाफसह संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला.crime news
“Bhadravati Police raid the cockfight market in the Gorja scrub forest.”
छाप्यादरम्यान काही इसम कोंबड्यांवर पैशांची बाजी लावताना आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच काही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले, तर एका आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. घटनास्थळावरून चार दुचाकी वाहने, नगद रक्कम, तीन जखमी कोंबडे, दोन लोखंडी धारदार कात्या असा एकूण १,५६,३०० रुपये किमतीचा मुद्देमाल भद्रावती पोलिसांनी जप्त केला आहे.
सदर गुन्ह्यात एकूण पाच आरोपी असून, चौघे फरार आहेत. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.
ही धडक कारवाई मा. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विरेंद्र केदारे तसेच गुन्हे शोध पथकातील पोउपनि गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, धर्मराज मुंडे, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, अनुप आष्टुनकर, गोपाल आतकुलवार, भारत पुसांडे, खुशाल कावळे, संतोष राठोड, योगेश घाटोडे, किरण चहांदे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
0 comments:
Post a Comment