वरोरा :- वरोरा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले ट्रामा केअर सेंटर चे उद्घाटन आज खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रामुख्याने माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड, उपविभागीय अधिकारी वरोरा सुभाष शिंदे, तहसीलदार रोशन मकवाने ,ठानेदार दिपक खोब्रागडे , न.प.वरोराचे मुख्यधिकारी भोयर साहेब, डॉ.खापने साहेब , सभापती राजू चिकटे आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार,बाळुभाऊ धानोरकर व आमदार प्रतीभाताई धानोरकर यांचा हस्ते रविवारी सकाळी ट्रामा केअर चे उद्घाटन पार पडले. यावेळी ट्रामा केअरला आवश्यक सेवा पुरवल्या जाईल व येणाऱ्या भविष्यात 100 खाटांचे सुसज्ज दवाखाना उभारण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कोविडमध्ये डॉक्टरांनी उत्कृष्ट काम केले असून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाल्याने सर्व कर्मचारी व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले.
0 comments:
Post a Comment