भद्रावती शहर राष्ट्रीवादि युवक काँग्रेस तर्फे पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडर दरवाढीचा निषेधार्थ तीव्र आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा आव्हानाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहर उपाध्यक्ष सुरज भेले व स्थानिक पदाधिकारी यांनी पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढी विरोधात बंद दुचाकी वाहनांना धक्का मारत तहसील कार्यालया पर्यंत नेवुन अभिनव आंदोलन केले. त्यानंतर तहसीलदार यांना भेटून त्यांचा मार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविले. यावेळी केंद्रातील भाजप सरकारचा तिर्व निषेध करण्यात आला. तसेच धोरण मोदिंचे मरण जनतेचे मोदिजी नही चाहिहै अच्छे दिन लोटादो हमारे बुरे दिन. अशा प्रकारेचे नारे दिले. या आंदोलनात अक्षय पाटिल, शुभम किटे, असार पठाण, विशाल गुरूनूले, धिरज कन्नेकार, मिलिंद रामटेके, ओम मलके, सुरज रोडे, उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment