घुग्घुस प्रतिनिधी :- बुधवार 20 ऑक्टोबर रोजी येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात रामायण महाकाव्याचे रचनाकार, आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती घुग्घुस येथील धिवर भोई समाज बांधवासमवेत उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प व पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.
मनोगत व्यक्त करतांना भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले महर्षी वाल्मिकी यांची जयंती प्रत्येक शासकीय कार्यालयात साजरी व्हावी त्यांनी आपल्या लेखणीतून प्रभू रामाला घरा घरात पोहचविले. धिवर भोई समाज बांधवाना ई-श्रम कार्डची माहिती देण्यात आली. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भारत सरकारचे ई-श्रम कार्ड जयंती निमित्त मोफत काढून देने सुरु करण्यात आले. कामगाराचे मृत्यू झाल्या 2 लाखाचा विमा मिळनार आहे. कामगारांना सर्व शासकीय योजनायाच कार्ड मार्फत मिळणार आहेत.
यावेळी भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, *वाल्मिकी ऋषी धिवर भोई समाज संस्था घुग्घुसचे अध्यक्ष सतीश कामतवार, सचिव बबन पारशिवे, कोषाध्यक्ष मारोती बोरवार, माजी सरपंच संतोष नुने, परशुराम पचारे, साजन गोहने,* भारत साळवे, विजय कामतवार, प्रवीण सोदारी, विजय मांढरे, विनोद जंजर्ला, छोटू मांढरे, तुलसीदास ढवस, संतोष कामतवार, सारंग कामतवार, मंगेश नागपुरे, रामदास दिघोरे, अशोक खेळेकर, सुनील मांढरे, मारोती बोरवार, रमेश कामतवार, आत्माराम मांढरे, मुकेश कामतवार, रितेश मांढरे, मनमोहन महाकाली, संगीता खाडे, प्रतिमा मुळे, कविता निखूरे, सुनंदा लिहीतकर उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment